1. सकाळच्या वेळी बीटरूट ज्यूस पिल्यास त्वचा उजळते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. बीटरूट ज्यूसमधील व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचा उजळ करण्यात मदत करतात.
2. बीटरूट ज्यूस रक्तातील टॉक्सिन्स कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. रक्त स्वच्छ झालं की पिंपल्स, एक्ने, ब्लॅकहेड्स कमी होतात. त्यामुळे रक्तशुद्धीसाठी देखील बीट ज्यूस मदत करते.
advertisement
3. बीटमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. सकाळी पिल्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि स्किन मऊ दिसण्यास देखील मदत होते. अँटिऑक्सिडंट्समुळे वृध्दत्वाची चिन्हे कमी जाणवतात. स्किन टाइट होऊन यंग दिसू लागते.
4. बीटमधील बेटालेन पिगमेंटेशन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. चेहऱ्यावरील लालसरपणा, ऍलर्जीमुळे होणारी चिडचिड कमी करतात. बीटरूट ज्यूसमध्ये भरपूर लोह असते. लोह नीट मिळाले की, स्किनला पिंक ग्लो येतो, निस्तेजपणा कमी होतो.
बीट ज्यूस कधी आणि कसा घ्यावा?
सकाळी रिकाम्या पोटी बीट ज्यूस पिणे सर्वात उपयुक्त ठरू शकते. ½ किंवा 1 मध्यम बीट, त्यात थोडं लिंबू घालून प्यायल्यास फायदे दुप्पट होतात. BP चा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ज्यूस घ्यावा. तसेच कोणतीही ॲलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.





