धार्मिक कार्यांपुरते मर्यादित नाही
जास्वंदीचा वापर फक्त धार्मिक कार्यांसाठी मर्यादित नाही, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे आपल्याला बहुतेक माहीत नाहीत. आयुर्वेदात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. जास्वंदाच्या फुलाचे तसेच पानाचे अनेक फायदे सांगितले आहेत.
केसांसाठी उपयोग
जास्वंदाच्या फुलाचा आणि पानाचा लेप केसगळती आणि कोंड्याच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे. यामुळे केसांचे फॉलिकल्स मजबूत होतात आणि केसांची वाढ अधिक चांगली होते. विविध अभ्यासांनी याची उपयुक्तता सिद्ध केली आहे.
advertisement
रक्तवर्धक आणि ब्लडप्रेशर नियंत्रक
जास्वंदीचे फुल सुकवून त्याची पावडर करून दुधासोबत घेतल्यास रक्ताची कमतरता दूर होते. तसेच हे फुल ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी आहे. तरीही उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डायबिटीस नियंत्रण
जास्वंदीच्या पानांचे दररोज सेवन किंवा फुल-पानाचा चहा डायबिटीस नियंत्रित करण्यास मदत करतो. मात्र, अस्थमा किंवा दमा असल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
त्वचेसाठी उपयोग
जास्वंदीच्या पानाचा रस चेहऱ्याला लावल्यास कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा निरोगी आणि नाजूक राहते. हे फुल त्वचा सुंदर ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय मानले जाते.
गणपती बाप्पाला आवडते हे फुल केवळ पूजेपुरते मर्यादित नाही, त्याचा रोजच्या जीवनात योग्य वापर केल्यास सौंदर्य, आरोग्य आणि मानसिक तणाव कमी करण्यासही मदत होते.