कोल्हापूर : बरेच लोक सकाळची सुरुवात गरमगारम दुधाच्या चहाने करतात. आहार तज्ज्ञांच्या मते सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्याचा तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. पण तरीही काही लोकांचं चहा पिणं सुटत नाही. मात्र आता विचार करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की नुकत्याच झालेल्या एका संशोधनात चहाच्या अतीसेवनाने प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो असं निदर्शनास आलं आहे. चहा ही एक सवय आहे जी बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. जर तुम्ही देखील चहाचे शौकीन असाल तर दुधाच्या चहाच्या अती सेवनाने नेमके आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? याबद्दलच आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
पचनसंस्थेवर परिणाम
दुधाचा चहा सकाळी प्यायल्याने पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. कारण चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते. ज्यामुळे पोटातील एसिडीटी वाढण्याचं कारण ठरू शकतं. दुधाचा चहा प्यायल्याने पोटात गॅसेसचे प्रमाण वाढतं, पोटात जळजळ आणि पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच सकाळी उठून कधीच चहाचे सेवन करू नका, असं आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे सांगतात.
आजार जवळच येणार नाहीत, आरोग्याचा खजिना आहेत तुळशीची पानं, पाहा खाण्याचे फायदे
दुधाचा चहा वाढवू शकतो तुमचं वजन
दुधाच्या चहाच्या अतिसेवनाने वजन वाढण्याचे प्रमाण देखील वाढू शकते कारण दुधाच्या चहात साखर आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे दुधाचा चहा हा वजन वाढण्याचे कारण ठरू शकतो. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा टाळणं गरजेचं आहे. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचे कारण देखील दुधाचा चहा ठरू शकतो.
कॅफिनचा प्रभाव
चहामध्ये असलेला कॅफिन मेंदूला ताजेतवाने करतो, त्यामुळे मानसिक ताजगी राहते. यामुळे एकाग्रतेतही सुधारणा होते आणि त्यामुळे दिवसभर काम करत असताना थकवा दूर होतो. परंतु, जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्यास झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कॅफीन शरीरातील उतेजक पद्धतीला उत्तेजित करतो, ज्यामुळे रात्री झोप लागण्यात अडचणी येऊ शकतात. विशेषतः चहा किंवा कॅफीनयुक्त अन्य पेय संध्याकाळी घेतल्यास झोपेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कॅफिनचं सेवन नियंत्रित प्रमाणात करणं महत्त्वाचं आहे, असं आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे सांगतात.
प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो
चहामुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नाष्टा केल्यानंतरच चहा घ्यावा किंवा जेवण आणि नाश्ता करताना चहाचे सेवन टाळावं. त्याचबरोबर रिकामा पोटी चहा पिल्यानंतर त्याचा नकारात्मक प्रभाव हा पुरुषांवर अधिक जाणवतो. या सवयीचा परिणाम शरीरातील काही अवयवांवर होऊन प्रोस्टेट कॅन्सरसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, असंही आहार तज्ज्ञांनी सांगितलं.