नॅचरल ग्लोसाठी शरीरातील अग्नी संतुलित ठेवणे महत्त्वाचं
बहुतेक मेकअप प्रॉडक्टमध्ये केमिकल्स असतात. यांचा वारंवार वापर केल्यास शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती कमी होते. पचनशक्ती बिघडली की, शरीरात उष्णता वाढते आणि त्याचे दुष्परिणाम त्वचेवर त्वरित दिसू लागतात. लहान वयातच पिंपल्स, ब्लॅकहेड्स, अत्याधिक तेलकट त्वचा, तसेच केस गळती यांसारख्या समस्या पाहायला मिळतात. काही मुलींमध्ये तर पाळी अनियमित होणे, अंगात थकवा येणे अशा तक्रारी वाढतात.
advertisement
Sangli News: अबब! चक्क 300 अंडी देणारी कोंबडी, कमी खर्चात देतेय बक्कळ कमाई, शेतकऱ्यांची फेव्हरेट!
तज्ज्ञ सांगतात की, चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शरीरातील अग्नी संतुलित ठेवणे. यासाठी हलके, पचायला सोपे अन्न, जास्त पाणी पिणे, वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास त्वचेचं आरोग्य अधिक चांगलं राखता येतं.
नैसर्गिक लिपस्टिक, जे आय शॅडो म्हणूनही वापरता येते
घरच्या घरी तयार करता येणारी काही सुरक्षित मेकअप प्रॉडक्ट देखील आहेत. जसे की, घरच्या तुपातले किंवा बदामाच्या तेलातले काजळ, डाळिंबाचा रस आणि बीटरूटपासून तयार केलेले नैसर्गिक लिपस्टिक, जे आय शॅडो म्हणूनही वापरता येतात. काकडीचा रस आणि बऱ्याच अशा नैसर्गिक घटकांनी चेहऱ्याला नॅचरल ग्लो मिळतो आणि त्वचेची अस्सल सुंदरता टिकून राहते.
मेकअप प्रॉडक्टचा वापर पूर्णपणे टाळायची गरज नाही, परंतु त्यांच्या वापरात मर्यादा आवश्यक आहे. नॅचरल ग्लो हा मेकअपने नव्हे तर शरीराच्या नैसर्गिकरीत्या आरोग्य राखल्याने होतो. याची जाणीव लहान वयातच झाली तर पुढील आयुष्यात त्वचेच्या समस्या टाळता येऊ शकतात.





