डोपामिनची असंतुलित पातळी मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी घातक
डॉ. राठी सांगतात, आपल्या मेंदूमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारं डोपामिन हे रसायन आपल्याला आनंद देतं, लक्ष केंद्रित करण्यास मदत करतं. मात्र, सतत रिल्स पाहिल्यामुळे या डोपामिनचं असंतुलन निर्माण होतं, त्यामुळे मेंदूची नैसर्गिक कार्यक्षमता कमी होते. या बदलांचा सर्वात मोठा परिणाम असा होतो की, एखादं महत्त्वाचं काम करताना लक्ष लागत नाही, विसरभोळेपणा वाढतो आणि झोपेचा दर्जाही खालावतो.
advertisement
Health Tips: पाठ दुखी होईल झटक्यात गायब, हे सोपे घरगुती उपाय लगेच करा
सेव्ह कॉन्टॅक्टमुळे मेंदू होत आहे आळशी
पूर्वी टेलिफोनच्या काळात शेकडो फोन नंबर लोकांना तोंडपाठ असायचे. मात्र, आज ‘सेव्ह कॉन्टॅक्ट’ आणि ‘वन टच कॉल’च्या सुविधेमुळे स्वतःचा नंबरही अनेकांना लक्षात राहत नाही. मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदू सतत तंत्रज्ञानावर अवलंबून राहतो, त्यामुळे मेंदूला वापरणं कमी होतं आणि तो आळशी बनतो.
मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोबाइलच्या आहारी
मोबाईलचा अतिवापर केवळ मोठ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर लहान मुलंही त्यात गुरफटलेली दिसतात. यामुळे झोपेवर परिणाम होतो, मानसिक तणाव वाढतो आणि संवाद कौशल्य कमी होतं. त्यामुळे मोबाईलचा वापर कामापुरता आणि मर्यादित ठेवण्याचा सल्ला डॉ. राठी यांनी दिला आहे.