मुंबई : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळ्यात सतत तहान लागत असल्यामुळे थंड प्येय पिणे आपल्या सर्वांनाच खूप आवडते. त्यामुळे बहुतेक लोक उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स, ताक, सरबत इत्यादींचे सेवन करतात. पण या गोष्टीं व्यतिरिक्त ऊसाचा रस पिल्यास आपल्या शरीराला विविध फायदे मिळतात. ऊसाचा रस पिल्यानं तहान तर भागतेच सोबतच शरीरासाठी ते अधिक फायदेशीर ठरते. ऊसाचा रस पोषक तत्वांनी समृद्ध असतो. त्यात कॅल्शियम, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट यासारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी देखील मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला ऊसाचा रस पिण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत याबद्दलचं आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
ऊसाच्या रसाचे फायदे आणि तोटे
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिल्यानं आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. ऊस हे एक असे जादुई फळ आहे जे आपल्याला हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करते. ऊसात पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असल्यामुळे उन्हाळ्यात ऊसाचा रस शरीर थंड ठेवण्यास मदत करते. पण उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचा अतिरेक केल्यास मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर पूर्व डायबेटिक स्टेजवर असाल तर ऊसाचा रस पिणे टाळणे गरजेचे आहे.
Heat Stroke remedies : उष्णतेच्या लाटा सुरू, मुलांना शाळेत पाठवताना घ्या अत्यंत महत्त्वाची काळजी
ऊसाच्या रसात पोटेंशिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे आपले हृदय त्याचबरोबर लिव्हर निरोगी राहते. लिव्हर निरोगी असल्यामुळे कावीळचा त्रास उद्भवत नाही. ऊसाचा रस पिल्यानं शरीरातील विषारी घटक ज्याला टॉक्सिन्स म्हणतात, ते आपल्या मूत्रभागातून विसर्जित होतात. त्यामुळे कुठलेही युरिनरी इन्फेक्शन होत नाहीत. सोबतच किडनीस्टोनचा त्रास देखील कमी होतो.
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका, हे घरगुती आयुर्वेदिक उपाय माहिती आहेत का? Video
एवढेच नव्हे तर ऊसाचा रस पिल्यानं आपल्या शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यास मदत होते. जेणे करून ऊसाचा रस वजन कमी करण्यास देखील मदत करते, अशी माहिती आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.