मोबाईलचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये डोळ्यांचे आजार, डोकेदुखी, मानदुखी आणि झोपेचे विकार वाढतात. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांचा कोरडेपणा जाणवतो आणि दृष्टी कमी होण्याची शक्यता वाढते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते आणि थकवा जाणवतो.
Hair Care Tips : 'ही' लहान पानं केस बनवतात मजबूत-रेशमी, पांढऱ्या केसांवरही फायदेशीर! पाहा वापर
advertisement
मानसिक आरोग्यावरही मोबाईलचा तितकाच वाईट परिणाम होतो. सोशल मीडिया आणि गेमिंगच्या अतिरेकामुळे ताणतणाव, चिंता, नैराश्य आणि एकटेपणा वाढतो. तरुण आणि लहान मुलांमध्ये अभ्यासात रस कमी होणे, एकाग्रता ढासळणे आणि समाजापासून दुरावा निर्माण होणे यांसारखी लक्षणे दिसतात.
मोबाईलच्या वापरामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्याने लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार वाढण्याचा धोका असतो. दिवसभर मोबाईलमध्ये गुंतल्याने व्यायाम आणि खेळापासून लोक दूर राहतात. परिणामी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजार पटकन होण्याची शक्यता वाढते.
या सर्व त्रासांपासून वाचण्यासाठी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. झोपेच्या आधी मोबाईल टाळावा, दिवसातून ठराविक वेळच वापर करावा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी 20-20-20 नियम पाळावा. म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहणे. मोबाईल जीवनासाठी उपयुक्त असला तरी त्याचा अतिरेक धोकादायकच ठरतो.