कमरेच्या आणि पाठीच्या दुखण्यावर तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय खरोखर करामती ठरू शकतात. रोज रात्री झोपण्याआधी गरम हळदीचं दूध पिणं, यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि सांधेदुखीवर आराम मिळतो. तसेच गरम पाण्याची पिशवी कमरेवर 10–15 मिनिटं ठेवल्यास स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होते.
advertisement
Fitness Tips : ना जिमची गरज, ना सकाळी फिरायची कटकट; ही डाळ खा, शरीर बनेल स्लिम-फिट!
तिळाचं तेल थोडं गरम करून हलक्या हाताने मालीश केल्यानेही कमरेला दिलासा मिळतो. विशेषतः खोबरेल तेलात लसूण परतून तयार केलेलं तेल दुखणाऱ्या भागावर लावल्यास फार मोठा फरक जाणवतो. हे तेल नियमित वापरल्यास जुनाट पाठीदुखीही कमी होते, असं अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे अशा घरगुती उपायांनी फरक पडतो, असं डॉक्टर हनुमान सांगळे सांगतात.
यासोबतच काही योगासनेसुद्धा उपयोगी ठरतात. भुजंगासन, मकरासन, शलभासन ही पाठीला बळकटी देणारी आणि रक्ताभिसरण सुधारणारी आसने आहेत. ही आसने रोज फक्त 10 मिनिटं केल्यानेही कमरदुखीवर प्रभावी परिणाम होतो. हे उपाय नियमित केल्यास औषधांवरील अवलंबित्वही टाळता येतं.
तथापि जर त्रास सतत वाढत असेल, पायाला सुन्नपणा जाणवत असेल किंवा चालताना त्रास होऊ लागला, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय हे सुरुवातीच्या टप्प्यावर प्रभावी असले तरी गंभीर स्थितीत वैद्यकीय उपचार महत्त्वाचे असतात. योग्य वेळेत काळजी घेतली, तर कमरेच्या आणि पाठीच्या आजारांवर नक्कीच मात करता येते, असंही डॉक्टर हनुमान सांगळे यांनी सांगितलं.





