पोटात गॅस किंवा अपचन झाल्यास, ओव्याचं पाणी किंवा हिंगाचा लेप उपयोगी ठरतो. हिंग पाण्यात मिसळून नाभीभोवती लावल्याने आराम मिळतो. तसंच हलका आहार, कोमट पाणी यामुळेही पोटदुखी कमी होते. मुलं जर रडत असतील, पोट धरून बसत असतील किंवा जेवण टाळत असतील तर ते गंभीर लक्षण असू शकते. अशावेळी घरगुती उपायांबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
Health Tips: मोबाईलवर सतत रिल्स पाहताय? आजचं सोडा सवय, नाहीतर हे परिणाम सोडणार नाहीत साथ
जर मुलाला अतिसार झाला असेल तर ओआरएस पावडरचे पाणी देणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. मुलांनी सतत सैल शौच करत असल्यास, सुस्ती जाणवत असल्यास किंवा ताप असल्यास तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. मुलांच्या शरीरात लवकर बदल होतात म्हणून थोडाही विलंब होऊ नये.
कधी कधी पोटदुखीचे कारण कृमी (जंत) असते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी जंतनाशक औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देणं गरजेचं आहे. यामुळे पोट साफ राहतं आणि पचन सुधारतं. तसेच, मुलांच्या आहारात फायबरयुक्त फळं जसं की पपई, सफरचंद यांचा समावेश केल्यास पचनक्रिया सुरळीत राहते.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुलांना स्वच्छ पाणी, वेळेवर आणि पौष्टिक आहार आणि स्वच्छ हात यांची सवय लावावी. खेळून झाल्यावर आणि जेवणाआधी हात धुण्याची सवय लावल्यास संसर्गजन्य आजार टाळता येतात. पोटदुखी ही छोटी गोष्ट वाटत असली तरी योग्य वेळेस उपचार न घेतल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते, त्यामुळे सजग राहणं आवश्यक आहे.





