TRENDING:

Psoriasis: सोरायसिस म्हणजे नेमकं काय? लक्षणे, औषधे आणि उपचार, पूर्ण माहिती!

Last Updated:

त्वचेवरील साधी वाटणारी समस्या कधी गंभीर वळण घेईल आणि सोरायसिस होईल काही कळतही नाही. 'सोरायसिस' हा त्वचारोग आहे, जो सुरुवातीला साधा वाटतो पण नंतर गंभीर वळण घेऊ शकतो. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

नाशिक : त्वचेवर पुरळ आली की ती घालवण्यासाठी आपण खटाटोप करतो. खरंतर त्याकडे दुर्लक्षही करायला नको. कारण त्वचेवरील साधी वाटणारी ही समस्या कधी गंभीर वळण घेईल आणि सोरायसिस होईल काही कळतही नाही. 'सोरायसिस' हा त्वचारोग आहे, जो सुरुवातीला साधा वाटतो पण नंतर गंभीर वळण घेऊ शकतो.

मानवी डोळ्यांनी न दिसणारे त्वचेचे अनेक पातळ थर असतात. सर्वात वरचा थर परिपक्व असतो, संपूर्ण वाढ झालेल्या पेशी यातच असतात. आतील सर्व अवयवांचं रक्षण करणं, तापमान नियंत्रण अशा महत्त्वाच्या कार्यात त्या मदत करतात. हा परिपक्व थर बनण्यासाठी साधारणपणे 21 ते 28 दिवस लागतात. परंतु हे 28 दिवसांचं चक्र काही विशिष्ट कारणांमुळे 5 ते 7 दिवसांवर येऊन जेव्हा पोहोचतं तेव्हा हा परिपक्व पेशीचा थरावर थर साचत जातो. त्यालाच म्हणतात सोरायसिस.

advertisement

डोक्यात होणाऱ्या कोंड्याच्या स्वरूपातील सोरायसिसला स्कॅल्प सोरायसिस म्हणतात. संपूर्ण शरीरावर लहान लहान थेंबाप्रमाणे येणाऱ्या सोरायसिसला गुट्टाट सोरायसिस म्हणतात. संपूर्ण शरीरावर मोठ्या आकाराच्या सोरायसिसच्या चट्ट्यांना प्लेक सोरायसिस म्हणतात. फक्त तळहात आणि तळपायावर येणाऱ्या सोरायसिसला पामोप्लांटर सोरायसिस म्हणतात. सोरायसिसमध्ये नखं काळीनिळी पडणं, वेडीवाकडी होणं याला नेल सोरायसिस म्हणतात. संपूर्ण शरीरावर पसरलेल्या सोरायसिसमध्ये जेव्हा पाणी भरलेलं असतं किंवा लहान पुरळ दिसतात, तेव्हा त्याला पुस्टुलर सोरायसिस म्हणतात. काखेत, जांघेत किंवा इतर झाकून राहणाऱ्या भागांमध्ये होणाऱ्या सोरायसिसला इनवर्स सोरायसिस म्हणतात. त्वचेवरील सोरायसिससह काहीवेळा रुग्णांना संधिवात होतो, त्याला सोरियाटिक अर्थरायटिस म्हणतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आजारांशी लढते आणि संक्रमण टाळते. परंतु जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती जास्त जलद होते, तेव्हा जळजळ होऊ लागते आणि सोरायसिस होतो, असं म्हणतात.

advertisement

सोरायसिसवर ठोस अशी उपचारपद्धती नाही, परंतु काही घरगुती उपचार करून आपण या आजारावर मात करू शकता, असं तज्ज्ञ सांगतात. तसंच सोरायसिसवर उपचार करताना त्याचा प्रकार कोणता आहे यावर लक्ष देणं आवश्यक असतं. कारण बऱ्याचदा वेगवेगळे प्रकार बरे होण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागू शकतो. त्यानुसार उपचारांमध्ये बदल करावा लागतो. तसंच सोरायसिसच्या एकाच रुग्णामध्ये एकाच वेळी सोरायसिसचे एकापेक्षा अनेक प्रकार असू शकतात. नाशिक येथील निसर्ग उपचार तज्ज्ञ मिलिंद कोटे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

advertisement

सोरायसिसची लक्षणे

  • त्वचेवर जळजळ होणं, अस्वस्थ होण्याएवढी खाज सुटणं. या खाजेमुळे रात्रीची झोपही उडू शकते.
  • त्वचेचे कोरडे, भेगा पडलेले भाग ज्यात हलके ओरखडे पडून रक्तस्त्राव होऊ शकतो.
  • हाता-पायांच्या नखांवर खड्डे पडणं, नखांचा रंग बदलणं, नखं चुरगळणं, असामान्य जाड होणं. नेल सोरायसिसमुळे नखांची काळजी घेणंही कठीण होऊ शकतं.
  • सांधे दुखणं, धडधडणं, फुगणं, कडक वाटणं. सोरायसिस असलेल्या 30 टक्के लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो.
  • advertisement

उपचार 

  • कोरड्या त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचा मऊ होते.
  • अर्धा किंवा चमचाभर त्रिफळा चूर्ण घ्यावं. त्यात 2 डाळींइतकं लोह भस्म घालावं. मग अर्धा चमचा मध आणि तूप घालून हे मिश्रण सकाळी, संध्याकाळी जेवणानंतर घ्यावं.
  • जर जास्त आग होत असेल तर दंडक सरायन वटी जेवणानंतर दिवसातून एकदा घेणं फायद्याचं ठरू शकतं. जर जास्त आग होत असेल तर त्या भागावर महामरिच्यादि तेल लावावं. 

काय खावं आणि काय खाऊ नये?

  • दूध, दही आणि मीठ कमी प्रमाणात खावं. शक्य असल्यास खाणं टाळावं.
  • अंघोळ करताना साबण वापरू नये. साबणाऐवजी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा मुलतानी मातीचा वापर करावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

(सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Psoriasis: सोरायसिस म्हणजे नेमकं काय? लक्षणे, औषधे आणि उपचार, पूर्ण माहिती!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल