Salt : जेवण चविष्ट होण्यासाठी मीठाचा मोह नको, अतिसेवनानं होईल शरीराला त्रास, तब्येतीला जपा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आहारात मीठ कमी असणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. मधुमेह, हृदयविकार असलेल्यांसाठी मीठाचं प्रमाण कमी असणं उपयुक्त ठरतं.
मुंबई : मीठ नसेल तर जेवण अळणी लागतं. पण मीठ जास्त खाल्लं तर शरीरालाही हानिकारक असतं. विशेषत: ज्यांना रक्तदाब, मधुमेह असेल त्यांना जास्त मीठ खाल्ल्याचा त्रास होऊ शकतो. अनेक आरोग्य तज्ज्ञ मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. कारण मीठामध्ये सोडियम असतं, आणि यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो.
मीठ कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचं काम करतं. पण मिठाचं प्रमाण थोडं वाढलं किंवा कमी झालं तर तुमच्या जेवणाची चव बिघडू शकते. पण मीठ कमी खाल्लं तर तुमच्या शरीरात काय होतं ? तुम्ही उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचे रुग्ण असाल तर मीठाचं सेवन मर्यादित प्रमाणात करा.
पाहूया कमी मीठ खाण्याचे फायदे...
advertisement
1. रक्तदाब -
रक्तदाबाच्या रुग्णांनी जेवणातील मीठाचं प्रमाण कमी ठेवावं. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचं रुग्ण असाल तर
मीठ कमी खाण्याचा प्रयत्न करा.
2. हाडं -
तुम्ही तुमच्या आहारात जास्त प्रमाणात मीठ खाल्लं तर त्यामुळे मुत्रामार्गे जास्त कॅल्शियम बाहेर पडतं.
त्यामुळे हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, म्हणजे मिठाच्या अतिसेवनानं हाडं कमकुवत होऊ शकतात.
advertisement
3. मेंदू-
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याचा परिणाम मेंदूच्या कार्यावरही होतो. मेंदूला रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या यामुळे ब्लॉक होतात किंवा अरुंद होतात, ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी जेवणातील मिठाचं प्रमाण कमी ठेवावं.
4. हृदय-
advertisement
हृदय निरोगी ठेवण्यासाठी मिठाचं सेवन कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हृदयविकार असेल तर मीठ कमी खाणं चांगलं. मीठाच्या अतिसेवनानं डीहायड्रेशन होऊ शकतो. मीठ प्रमाणात खाल्लं तर हा त्रास जाणवणार नाही.
जागतिक स्तरावर मृत्यूचं प्रमुख कारण असलेल्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या प्रतिबंधासाठी
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नं प्रति व्यक्ती 5 ग्रॅम (अंदाजे 2 ग्रॅम सोडियम) पेक्षा
advertisement
कमी मिठाचं सेवन करण्याची शिफारस केली आहे. विविध देशांतील माहितीनुसार, बहुतांश नागरिक
शिफारसीपेक्षा जास्त मीठ खातात. हे तब्येतीसाठी हानिकारक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2024 2:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Salt : जेवण चविष्ट होण्यासाठी मीठाचा मोह नको, अतिसेवनानं होईल शरीराला त्रास, तब्येतीला जपा