IND vs SA : पराभवाचे व्हिलन कोण? मॅचनंतर कॅप्टन सूर्याने थेट घेतली दोघांची नावे
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
साऊथ आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतासोबत 1-1ने बरोबरी साधली आहे. यानंतर कॅप्टन सूर्याने पराभवाला जबाबदार ठरलेल्या दोघांची नावे सांगितली आहे.
advertisement
advertisement
सूर्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सामन्यानंतर गोलंदाजी घ्यायवा हवी होती, असे सुर्यकुमार बोलला आहे. आम्ही आधी गोलंदाजी केली आणि नंतर त्यांना समजले की या विकेटवर लेंथ किती महत्त्वाच्या आहेत. पण हो, ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. फक्त शिका आणि पुढे जा,असे सूर्या म्हणाला आहे.
advertisement
थोडेसे दव पडणे आणि जर ते काम करत नसेल तर आम्हाला दुसरी योजना आखायला हवी होती, पण आम्ही त्याकडे गेलो नाही. पण ते ठीक आहे. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. त्यांनी दुसऱ्या डावात कशी गोलंदाजी केली हे आम्हाला शिकायला मिळाले. आम्ही त्यातून शिकलो आणि नंतर आम्ही पुढच्या सामन्यात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू असे देखील सूर्याने सांगितले आहे.
advertisement
सूर्यकुमार यादवने यावेळी स्वत:ला आणि शुभमन गिलला पराभवाचं व्हिलन ठरवलं आहे. मला वाटतं मी आणि शुभमन चांगली सुरुवात देऊ शकलो असतो.कारण आम्ही नेहमीच अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यामुळे त्याचा ऑफ-डे असू शकतो. मी, शुभमन आणि इतर काही फलंदाजांनी ते स्वीकारायला हवे होते,असे सांगत सूर्याने पराभवाची जबाबदारी स्विकारली.
advertisement
advertisement










