advertisement

Vijaya Ekadashi 2026: विजयी भव: शुक्रवारी विजया एकादशीचे व्रत, शुभ मुहूर्तावरील केलेली पूजा भरभराट करेल

Last Updated:

Vijaya Ekadashi 2026: विजया एकादशीची विधीपूर्वक पूजा केल्याने श्रीनारायणाची विशेष कृपा प्राप्त होते. पौराणिक कथांनुसार, प्रभू रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांनी रावणाचा पराभव केला होता. यावर्षी विजया एकादशीचे

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात एकादशी तिथींना विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात, एकादशीचं व्रत श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने श्रीनारायणाची विशेष कृपा प्राप्त होते. पौराणिक कथांनुसार, प्रभू रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांनी रावणाचा पराभव केला होता. यावर्षी विजया एकादशीचे व्रत 13 फेब्रुवारी 2026 रोजी पाळले जाणार आहे.
विजया एकादशी 2026 मुहूर्त - पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी तिथीचा प्रारंभ 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांनी होईल. या तिथीची समाप्ती 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी होणार आहे. एकादशीची पूजा करताना मनात सतत हरीनामाचा जप करत राहावे.
उपवास सोडण्याची वेळ - विजया एकादशीच्या व्रताचे पारण 14 फेब्रुवारी रोजी केले जाईल. पारण करण्याची वेळ सकाळी 7 वाजून 7 मिनिटे ते सकाळी 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत असेल. पारण तिथीच्या दिवशी द्वादशी दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी संपणार आहे. एकादशीचे पारण द्वादशी संपण्यापूर्वी करणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही.
advertisement
पूजा विधी - विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे किंवा नारंगी रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजेच्या जागी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करून घ्या आणि एका चौरंगावर पिवळे कापड अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाला चंदनाचा टिळा लावावा आणि फुलांचा हार अर्पण करावा. भगवान विष्णूंना पंचामृत, पिवळी मिठाई, गूळ-फुटाणे आणि तुळस अर्पण करावी. नारायण सोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी आणि कथा ऐकून विष्णूंची आरती करावी.
advertisement
भगवान विष्णूंचे प्रभावी मंत्र -
ॐ नमोः नारायणाय॥
ॐ नमोः भगवते वासुदेवाय॥
ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुडध्वजः। मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vijaya Ekadashi 2026: विजयी भव: शुक्रवारी विजया एकादशीचे व्रत, शुभ मुहूर्तावरील केलेली पूजा भरभराट करेल
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement