IND vs SA : बेल्सला बॉल लागला, लाईटही लागली, तरी जितेश आऊट नाही... मैदानात मोठा ड्रामा
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मुल्लानपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
मुल्लानपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मुल्लानपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. 214 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत सापडली, तेव्हा जितेश शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण करत होता. 16 व्या ओव्हरमध्ये ओटनील बार्टमनने टाकलेला बॉल जितेश शर्माला खेळता आला नाही, यानंतर बॉल बेल्सला जाऊन लागला आणि बेल्सचे लाईटही लागले, पण बेल्स न पडल्यामुळे जितेश शर्मा आऊट झाला नाही. दक्षिण आफ्रिकेची टीम आणि जितेशलाही घडलेल्या घटनेवर विश्वास बसला नाही.
हे जीवनदान मिळाल्यानंतर जितेश शर्माने बार्टमनला सिक्स मारली, पण त्यानंतर तो फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मोठा शॉट मारताना जितेशने सिपामला याला विकेट दिली. 17 बॉलमध्ये 27 रन करून जितेश शर्मा आऊट झाला. जितेशची विकेट जाताच टीम इंडियाच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. जितेशने त्याच्या खेळीमध्ये दोन फोर आणि दोन सिक्स मारले.
advertisement
टीम इंडियाचा 51 रननी पराभव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 51 रननी दारुण पराभव झाला. टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला पहिले बॅटिंगसाठी बोलावले. यानंतर, क्विंटन डी कॉक (90) च्या जलद अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 4 आऊट 213 रन केल्या. प्रत्युत्तरात, तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा 19.1 ओव्हरमध्ये 162 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
डी कॉकच्या 46 बॉलच्या या खेळीत सात सिक्स आणि पाच फोर होते. डोनोवन फरेराने नाबाद 30, कर्णधार एडेन मार्करामने 29 आणि डेव्हिड मिलरने 20 रनचे योगदान दिले. भारतीय बॉलिंगमध्ये वरुण चक्रवर्तीने २९ रनमध्ये दोन विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलला एक विकेट घेण्यात यश आलं.
view commentsLocation :
Mullanpur Dakha,Ludhiana,Punjab
First Published :
December 11, 2025 11:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : बेल्सला बॉल लागला, लाईटही लागली, तरी जितेश आऊट नाही... मैदानात मोठा ड्रामा










