Mumbai: मुंबईतील मस्जिद बंदर भागात इमारतीची बाल्कनी कोसळली, 1 ठार, घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

गुरुवारी रात्री ८.५७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाल्कनीच्या खाली दबल्यामुळे एका जणाचा मृत्यू झाला आहे. 

News18
News18
श्रीकृष्ण औटी, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईतून एका दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. मस्जिद बंदर परिसरात कोटक भवन या   इमारतीची बाल्कनी कोसळली. या दुर्घटनेमध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मस्जिद बंदर परिसरात असलेली कोटक भवनची इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनी कोसळली. गुरुवारी रात्री ८.५७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाल्कनीच्या खाली दबल्यामुळे एका जणाचा मृत्यू झाला आहे.
advertisement
अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी जखमींना ढिगारातून बाहेर काढलं. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळता मुंबई अग्निशमन दल (MFB) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने  मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर  २ जण जखमी आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
घटनास्थाळावर अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे.  पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी इमारतीची जीर्ण स्थिती तपासली जात आहे. इमारत रिकामी करण्यात आली. इमारतीत राहणाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. कोटक भवनाची बाल्कनी नेमकी कशी कोसळली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसंच मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबईतील मस्जिद बंदर भागात इमारतीची बाल्कनी कोसळली, 1 ठार, घटनास्थळाचा पहिला VIDEO
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement