New Adhaar Card Rule: आधार कार्डची झेरॉक्स काढता येणार नाही, सरकारचा नवा कायदा; नियम वाचून फोटोकॉपी मागण्याची हिम्मत होणार नाही

Last Updated:

Adhaar Card: आता कुठल्याही हॉटेल, इव्हेंट किंवा संस्थेला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स मागण्याचा अधिकार राहणार नाही. UIDAI च्या नव्या कडक नियमामुळे पेपरवरचा आधार इतिहासजमा होणार असून QR कोडद्वारेच ओळख पडताळली जाईल.

News18
News18
नवी दिल्ली: सरकारने आधार कार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, UIDAI लवकरच असा नवा नियम जारी करणार आहे. ज्यामुळे हॉटेल्स, इव्हेंट आयोजक आणि विविध संस्थांकडून आधार कार्डची फोटोकॉपी (झेरॉक्स) मागणे किंवा ती साठवून ठेवणे पूर्णपणे बंद होईल.
advertisement
सध्या सुरू असलेली फोटोकॉपी मागण्याची पद्धत विद्यमान Aadhaar Act चे उल्लंघन मानली जाते. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी सांगितले की, आधार पडताळणीसाठी एक नवी पद्धत मंजूर करण्यात आली आहे. या अंतर्गत हॉटेल, इव्हेंट आयोजक किंवा अन्य कोणतीही संस्था जी ऑफलाइन आधार वेरिफिकेशन करणार आहे; त्यांना नव्या सिस्टीममध्ये नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असेल.
advertisement
या नव्या प्रणालीमध्ये QR कोड स्कॅनिंग किंवा सध्या विकसित होत असलेल्या नवीन आधार मोबाइल अ‍ॅपद्वारे वेरिफिकेशन केले जाईल. हे नियम लवकरच अधिसूचित केले जाणार असून, पेपर-आधारित वेरिफिकेशनची गरज कमी करून प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सुरक्षित करण्याचा उद्देश आहे.
advertisement
अनेकदा इंटरमीडियरी सर्व्हरमुळे उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवरही या नव्या फ्रेमवर्कमुळे उपाय शोधले जातील. ऑफलाइन ऑथेंटिकेशन करणाऱ्या संस्थांना थेट API अ‍ॅक्सेस दिला जाईल. ज्यामुळे त्या त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ही प्रणाली सहजपणे समाविष्ट करू शकतील. याशिवाय App-to-App वेरिफिकेशनची सुविधा देणारा UIDAI चा नवीन अ‍ॅप बीटा टेस्टिंगमध्ये असून, प्रत्येक पडताळणीसाठी केंद्रीय सर्व्हरशी जोडणीची आवश्यकता कमी होईल.
advertisement
हे नवे तंत्रज्ञान विमानतळ, रिटेल स्टोअर्स तसेच वयोमर्यादेनुसार उत्पादने (मद्य, सिगारेट) विकणाऱ्या दुकानांमध्येही वापरता येणार आहे. UIDAI च्या मते, यामुळे व्यक्तीच्या गोपनीयतेस अधिक सुरक्षा मिळेल. पेपरचा वापर संपुष्टात आणेल आणि आधार डेटा लीक होण्याचा धोका आणखी कमी करेल.
advertisement
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे नवा आधार अ‍ॅप आगामी Digital Personal Data Protection (DPDP) कायद्यालाही सपोर्ट करणार आहे. जो पुढील 18 महिन्यांत पूर्णपणे लागू होईल. या अ‍ॅपमध्ये युझर्सना आपला अपडेटेड पत्त्याचा पुरावा अपलोड करू शकतील, तसेच ज्यांच्याकडे मोबाइल फोन नाही अशा कुटुंबीयांनाही या प्लॅटफॉर्मवर जोडू शकतील. 
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
New Adhaar Card Rule: आधार कार्डची झेरॉक्स काढता येणार नाही, सरकारचा नवा कायदा; नियम वाचून फोटोकॉपी मागण्याची हिम्मत होणार नाही
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement