भांडणात भाच्या चिडला अन् गुन्हेगार मामाला भर रस्त्यावर संपवला, सातऱ्यातील घटना

Last Updated:

ओगलेवाडी येथील भर चौकामध्ये भाचा आणि शेखर सूर्यवंशी याच्यामध्ये वाद झाला. पण काही क्षणांतच परिस्थिती चिघळली आणि

News18
News18
विशाल पाटील, प्रतिनिधी
कराड : साताऱ्यातून मामा आणि भाचा नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भाच्याने आपल्याच काकावर भर रस्त्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याच मामाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कराड तालुक्यातील ओगलेवाडी इथं भर दिवस मामा भाच्यात वाद झाला. या वादात भाच्याने मामावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात  मामा गंभीर जखमी झाला होता. जखमी असलेल्या मामाचा गुरूवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (वय 31, रा. हजारमाची, ता. कराड) असं खून झालेल्या मामाचं नावं आहे.
advertisement
मयत मामा  शेखर उर्फ बाळू सूर्यवंशी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुरूवारी दुपारी ओगलेवाडी येथील भर चौकामध्ये भाचा आणि शेखर सूर्यवंशी याच्यामध्ये वाद झाला. पण काही क्षणांतच परिस्थिती चिघळली आणि संतापाच्या भरात भाच्यानं मामावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये शेखर सूर्यवंशी हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
जखमी शेखर सूर्यवंशी याला तात्काळ उपचारारसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं सायंकाळी सहा वाजता त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शेखर सूर्यवंशी हा मयत झाला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भांडणात भाच्या चिडला अन् गुन्हेगार मामाला भर रस्त्यावर संपवला, सातऱ्यातील घटना
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement