Pune Accident : अपघातातून वाचण्यासाठी चालकाची भरधाव गाडीतून उडी, पण मागून येणाऱ्या वाहनाने गेम केला, चेंदामेंदा झाला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे
Pune Accident : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पुण्याहून मुंबईच्या दिशेने चाललेल्या एका टॅकरचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे चालकाने भरधाव गाडीतून उडी मारली होती. पण मागून येणाऱ्या गाडीने त्याला चिरडल्याची घटना घडली आहे. खोपोली जवळ ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटातून पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक टँकर चालला होता. या प्रवासा दरम्यान टँकर चालकाचा पुढचा टायर पंक्चर झाला होता. ज्यामुळे टँकर अनबॅलेन्स झाला आणि त्याला अपघात होणार हे लक्षात येताच टँकर चालकाने भरधाव गाडीतून उडी मारली होती.
advertisement
गाडीतून उडी मारल्यानंतर त्याला अपघातातून वाचेल असे वाटत होते. पण मागून येणाऱ्या वाहनाने त्याला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर टँकर पंधरा ते वीस फूट खाली दरीत कोसळला.एक्सप्रेस वे वरील खोपोली जवळ ही घटना घडली.बोरघाट टॅब पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्या टँकर मधून केमिकलचा वास येत असल्याने पोलिसांनी केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 12, 2025 12:06 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : अपघातातून वाचण्यासाठी चालकाची भरधाव गाडीतून उडी, पण मागून येणाऱ्या वाहनाने गेम केला, चेंदामेंदा झाला











