TRENDING:

मांजर पाळत आहात? तर वेळीच सावधगिरी बाळगा, नाहीतर होऊ शकतो जीवघेणा आजार!

Last Updated:

घरात आपण मांजर पाळत असतो परंतु या मांजरीमुळे आपला जीव सुद्धा आपण धोक्यात घालत असतो. मांजर पाळल्यामुळे कोणता आजर होतो? याबद्दलचं नाशिक येथील पशूचिकित्सक डॉ. अनंत साखरे यांनी माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

मांजर हा प्राणी आपण आपल्या घरात हौशीने पाळत असतो. तो आपल्या घरातील एक सदस्य प्रमाणे वावरत असतो. परंतु मांजरामुळे रेबीज हा आजार लवकरत लवकर पसरत असतो.

संमोहनातून एखाद्या कडून हवं ते करून घेता येऊ शकतं का? समज आणि गैरसमजाबद्दल काय सांगतात तज्ज्ञ Video

काय आहे रेबीज?

advertisement

रेबीज हा एक असा जीवघेणा आजार आहे, जो रेबीज विषाणूच्या संसर्गामुळे होतो. ज्यामध्ये व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ लागतो. ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. साधारणपणे असे मानले जाते की हा आजार श्वानाच्या चावल्याने होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतरही असे अनेक प्राणी आहेत जे रेबीज पसरवू शकतात. यात मुख्यता मांजरचा ही समावेश आहे.

advertisement

रेबीज आजार होण्याची कारणे:

रॅबडो व्हायरस या विषाणूमुळे रेबीज आजार होतो. विषाणूंना चेतापेशीचे आणि लाळग्रंथीचे आकर्षण असते. विषाणू तुलनेने नाजूक आणि आयोडीन, एसीटोन, साबण, डिटर्जंट, इथर, फॉर्मेलिन, फिनॉल इत्यादी जंतुनाशकांसाठी संवेदनशील आहे.

सुकलेल्या लाळेतील विषाणू काही तासांत मरतात. विषाणू 50 अंश सेल्सियसमध्ये 1 तासात आणि 60 अंश सेल्सिअस तापमानात 5 मिनिटात नष्ट होतात. विषाणू शरीराबाहेर जास्त काळ टिकत नाही.

advertisement

विषाणू 3-11 दरम्यान पीएच (सामू) वर स्थिर राहतात. विषाणू थंड प्रतिरोधक असतो. -70 अंश सेल्सिअस तापमानात अनेक वर्षे टिकतो, 0-4 अंश सेल्सिअसवर गोठतो.

रेबीज आजार कोणाला होतो?

गरम रक्त असणाऱ्या मानवासह सर्व प्राण्यांमध्ये होतो. श्वान (कुत्रा), मांजर अधिक संवेदनक्षम आहे.

गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या या मध्यम संवेदनाक्षम आहेत.

लांडगे, मांजर, सिंह, मुंगूस, वटवाघूळ, माकड इत्यादी प्राण्यांनाही होतो.

advertisement

आजाराचे प्रमाण मादीपेक्षा नर श्वानांत अधिक आहे. आजार मादीत प्रामुख्याने माजावर येणाच्या कालावधीत अधिक प्रमाणात होतो.

रेबीज होऊ नये म्हणून काळजी?

नियमित लसीकरण हाच रेबीज रोग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाय आहे. मांजराच्या वयाचे 3 महिने झाल्यावर रेबीज प्रतिबंधक लसीची त्वचेखाली पहिली मात्रा द्यावी. त्यानंतर नियमितपणे दरवर्षी लस टोचून घ्यावी. रोगप्रवण भागात 70 टक्के श्वानांचे लसीकरण केले तर आजाराचे चक्र थांबवता येते, असं डॉ. अनंत साखरे सांगतात.

रेबीज प्रतिबंधक लस कोणत्या व्यक्तींनी घ्यावी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

उच्च जोखमीच्या व्यावसायिक गटातील व्यक्ती, जसे की पशुवैद्यक आणि प्राणी हाताळणारे त्यांचे कर्मचारी, रेबीज संशोधक आणि काही प्रयोगशाळा कामगार, मांजरी, श्वान इत्यादींच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती. आंतरराष्ट्रीय प्रवासी यांनी प्रतिबंधात्मक लस घ्यावी. प्रथम वेळी 0, 7 व 21/28 व्या दिवशी अशा तीन मात्रा घ्याव्यात. त्यानंतर दरवर्षी बूस्टर डोस घ्यावा, असंही डॉ. अनंत साखरे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मांजर पाळत आहात? तर वेळीच सावधगिरी बाळगा, नाहीतर होऊ शकतो जीवघेणा आजार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल