TRENDING:

Diwali 2025 : दिवाळीला फराळ बनवताय? पदार्थ तेलात की तुपात तळलेले चांगले? महत्त्वाच्या टिप्सचा Video

Last Updated:

दिवाळी म्हटलं की आपण सर्वजण आपल्या घरी छान टेस्टी असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार करत असतो. हे पदार्थ आपण तयार करताना तेलाचा किंवा तुपाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की आपण सर्वजण आपल्या घरी छान टेस्टी असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार करत असतो. हे पदार्थ आपण तयार करताना तेलाचा किंवा तुपाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. पण पदार्थ करत असताना कशाचा वापर करावा? म्हणजेच तेलाचा, साजूक तुपाचा की डालडा तुपाचा वापर करावा? याविषयीच आपल्याला आहारतज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement

‎‎आपण तळलेले पदार्थ दिवाळीसाठी बनवत असतो. यासाठी आपण तेल किंवा तुपाचा वापर करत असतो. शक्यतो जे कुठलेही तेल असेल, ते वापर तुम्ही करत आहात ते तेल त्याच्या स्मोकिंग पॉइंटपर्यंत जाता कामा नये. म्हणजेच मध्यम आचेवरती तेले तापवायला हवं. त्यावर पदार्थ तळा. धूर न निघता तळा. त्यामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण कमी होतं. जसे जसे तेलाचा उच्चांक वाढत जातो तसं तसं त्यामध्ये ट्रान्सफॅट होतो आणि त्यामुळे ते पदार्थ खाण्यासाठी घातक होतात. त्यामुळे शक्यतो मंद आचेवर पदार्थ कधीही तळलेला चांगला.

advertisement

Balipratipada 2025 : बलिप्रतिपदा म्हणजे काय? काय आहे साजरा करण्यामागची आख्यायिका? Video

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका? आहारात हे पदार्थ करा समावेश
सर्व पहा

‎यामध्ये साजूक तुपाचा वापर केलेला चालतो. याला सुद्धा स्मोक पॉइंटपर्यंत जाऊ देता कामा नये. त्याच्या पूर्वीच पदार्थ तळून घ्यायचे. शक्यतो साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर करावा तो याकरता की तुपाचं ट्रान्स फॅटमध्ये लवकर रूपांतर होतं आणि डालडा तुपाचा वापर अजिबात करू नये, असे आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे. नाहीतर तुम्ही कुठलाही पदार्थ हा शालो फ्राय करावा किंवा तुम्ही एअर फ्राय करून देखील पदार्थ खाऊ शकता. ते जास्त फायद्याचे आहेत.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diwali 2025 : दिवाळीला फराळ बनवताय? पदार्थ तेलात की तुपात तळलेले चांगले? महत्त्वाच्या टिप्सचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल