TRENDING:

Health Tips: पांढरा की पिंक? कोणता पेरू आरोग्यासाठी चांगला? आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

ज्या ऋतूमध्ये जी फळे येत असतात ती आपण खाल्लेच पाहिजे. कारण की प्रत्येक फळांमधून वेगवेगळे घटक आपल्या शरीराला मिळत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण की फळामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला मिळत असतात. ज्या ऋतूमध्ये जी फळे येत असतात ती आपण खाल्लेच पाहिजे. कारण की प्रत्येक फळांमधून वेगवेगळे घटक आपल्या शरीराला मिळत असतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. तर पेरू खाण्याचे काय फायदे होतात किंवा कुठला पेरू खावा पांढरा की पिंक? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी दिली आहे.
advertisement

पेरू खाणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात तसेच मिनरल्स, व्हिटॅमिन देखील असतात. पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट फायबरचा मुख्य स्त्रोत आहे. तसंच जर आपण पेरू खाल्ला तर यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं.

Health Tips: अपुरी झोप अन् सततचा ताण, मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतोय परिणाम, हे करा घरगुती उपाय

advertisement

कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहायला मदत होते. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि त्यामुळे आपलं जे डोळ्याचं आरोग्य आहे ते देखील चांगलं राहायला मदत होते. तसेच ज्यांना मधुमेह आहे ते देखील हा पेरू खाऊ शकतात, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.

दिवसभरामध्ये एखादा फळ खायचं म्हणजे शंभर ते दीडशे ग्रॅम पेरू तुम्ही दिवसभरात खाऊ शकता. त्यामुळे कुठलाही परिणाम हा तुमच्यावर होणार नाही. तसेच ज्यांना कुठलाही आजार नाही अशा नॉर्मल व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये पेरूचा समावेश करावा. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आपली पचन प्रक्रिया देखील चांगली राहते. त्यासोबत पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

पांढरा पेरू आणि पिंक पेरूमध्ये मुख्य फरक असा आहे की पांढऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर जास्त आहेत. पिंक पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट जास्त असतात त्यामुळे आपली स्किन चांगली राहायला देखील यामुळे मदत होते तर हा दोनमध्ये मुख्य फरक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये निश्चितच पेरूचा समावेश करावा, असंही  आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पांढरा की पिंक? कोणता पेरू आरोग्यासाठी चांगला? आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल