जिममध्ये हार्ट अटॅक येण्याची कारणे?
अचानक सुरू केलेला व्यायाम, बैठे जीवनशैली कधीच व्यायाम केलं नसताना अचानक जिम जॉईन करणे आणि जास्त व्यायाम करणे किंवा व्यायामाची तीव्रता अचानक वाढवणे, हृदयावरती याचा ताणू शकतो. अतिश्रम करणे म्हणजेच की शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे. व्यायामादरम्यान जास्त घाम येऊन डीहायड्रेशन, हायड्रेशन झाल्यामुळे शरीराचे संतुलन बिघडू शकतो. त्यामुळे हृदयावरती ताण येऊ शकतो.
advertisement
Health Tips : एकही गोळी न खाता मिळवा गंभीर आजारांतून सुटका! हे शक्यचं कसं होतं?
माहित नसलेला हृदय विकार, अनेकांना जन्मापासून किंवा आजपर्यंत हृदयाचा आजार आहे जसे की उच्च रक्तदाब मधुमेह याची माहिती नसणे यामुळे हृदयावरती ताण येऊ शकतो. तुम्हाला हृदयविकार येण्याची शक्यता असते. हे आजार असलेलं लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच जिम किंवा व्यायाम करावा. उच्च रक्तदाब मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल हे व्यायामाच्या पहिले नियंत्रणात असणे गरजेचे आहे.
काय काळजी घेतली पाहिजे?
सर्वात पहिले तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही जिम जॉईन करा. व्यायामाची सुरुवात करताना हळू सुरुवात करा म्हणजे की सुरुवातीला एकदम कमी व्यायाम करा आणि नंतर हळूहळू वाढवत जा. तुमच्या शरीराला जेवढे झेपेल तेवढाच व्यायाम करावा त्यापेक्षा जास्त व्यायाम करू नये.
शरीराच्या नवीन बदलांमध्ये लक्ष असू द्या. व्यायाम करताना छाती दुखणे दम लागणे चक्कर येणे यासारख्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी करा. शरीराला पुरेसा आराम द्या आणि सकस आणि पोषक आहार घ्या. तणाव व्यवस्थापन तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा कारण तणावामुळे देखील हृदयावर परिणाम होतो. व्यायामाची सुरुवात करताना योग्य ती काळजी घ्या आणि शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा.