याचाच परिणाम म्हणजे गेल्या तीन वर्षांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्त 48 मातांच्या पोटी निरोगी, एचआयव्हीमुक्त बाळांचा जन्म झाला आहे. ज्यांना स्वतःच्या उद्याचे भान नव्हते, त्या मातांच्या हातात आज पूर्ण निरोगी बाळ आहे. हा बदल त्यांच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला आहे.
advertisement
पूर्वी एखाद्या गरोदर महिलेला संसर्ग असल्याचे समजले की नवजात बाळाला संसर्ग होण्याची शक्यता मोठी असे. कुटुंबांमध्ये तणाव, संभ्रम आणि भीती पसरायची. मात्र अँटीरेट्रोव्हायरल थेरपी, वेळेवर तपासणी, योग्य औषधोपचार, तसेच तज्ज्ञांचे समुपदेशन यामुळे आईकडून बाळात संसर्ग जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात घटला आहे.
जागतिक एड्स प्रतिबंध दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (दिशा) तर्फे 1 ते 12 डिसेंबरदरम्यान जागरूकता कार्यक्रम राबवले जात आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.
निगेटिव्ह बाळांचे प्रमाण वाढतेय
जिल्ह्यात तपासणीदरम्यान आढळलेल्या 66 संसर्गित गरोदर मातांपैकी मोठ्या संख्येने निगेटिव्ह व सुदृढ बाळांना जन्म दिला आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी सांगितले की, नियमित तपासणी, ‘एआरटी उपचार आणि समुपदेशन यामुळे पॉझिटिव्ह आईकडूनही निरोगी बाळ जन्मास येऊ शकते. समाजाने या रुग्णांकडे भेदभावाने पाहू नये, हेच सर्वात महत्त्वाचे.
जिल्ह्यात उपलब्ध सुविधा
आयसीटीसी (एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र) : 18
एआरटी केंद्र : 3
पीपीपी एआरटी केंद्र : 1
सुरक्षा क्लिनिक : 2
जिल्ह्यातील आकडेवारी
वर्षगरोदर मातांची तपासणीएचआयव्ही पॉझिटिव्ह माताएचआयव्ही निगेटिव्ह बाळांचा जन्म
गरोदर मातांची तपासणी 2013 मध्ये 1,25,538...2024 99,281... 2025 69,703
'एचआयव्ही' पॉझिटिव्ह माता 2023 मध्ये 20... 2024 मध्ये 20... 2025 मध्ये 9
एचआयव्ही निगेटिव्ह बाळांचा जन्म 2023 मध्ये 9 2024 मध्ये 9 आणि 2025 मध्ये 9






