ऋषिकेश : सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरिरातील प्रत्येक अवयवाच्या सुदृढतेसाठी विशिष्ट व्यायाम आणि योगासनं दिलेली आहेत. आज आपण किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी आसनं पाहणार आहोत.
उत्तराखंडच्या ऋषिकेश भागातील योग अभ्यासक गोकुल बिष्ट यांनी सांगितलं की, किडनीच्या सुदृढ आरोग्यासाठी काही प्रभावी योगासनं आहेत. जी नियमितपणे केल्यास किडनीला पुरेसे पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन मिळू शकतं. योगासनांमुळे किडनीवरचा अतिरिक्त दबाव कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतं. आता आपण जी 3 आसनं पाहणार आहोत, ती किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
advertisement
हेही वाचा : पावसामुळे तळवे कुजणार नाहीत, उलट पाय चमकतील! फॉलो करा टिप्स
त्रिकोणासन : या आसनात सरळ उभं राहावं, पायात 3-4 फूट अंतर ठेवावं. आता उजव्या बाजूला कंबरेतून 90 अंशावर वाका, डावा पाय सरळ राहूद्या. उजवा हात खाली उजव्या पायावर ठेवा आणि डावा हात वरच्या बाजूला सरळ असूद्या. हा हातसुद्धा हळूहळू उजव्या बाजूला घेऊन जा. 20-30 सेकंद या स्थितीत राहा आणि मग हेच आसन दुसऱ्या बाजूने करा.
मलासन : यात सरळ उभं राहून पायांमध्ये खांद्यांएवढंच अंतर ठेवा. गुडघे वाकवून खाली वाका. दोन्ही हात जोडून छातीसमोर प्रार्थना मुद्रा तयार करा. हाताच्या कोपऱ्यांनी जांघांवर दबाव येऊद्या. 20-30 सेकंद या स्थितीत राहून हळूहळू उभे राहा.
हलासन : यामध्ये पाठीवर झोपा आणि हात शरिराजवळ ठेवा. दोन्ही पाय हळूहळू वर आणून डोक्यावरून अंगठे जमिनीला टेकवा. हात पाठीमागे न्या. काही सेकंद या स्थितीत राहून हळूहळू पाय खाली आणून झोपून जा. ही तीनही आसनं आपण इंटरनेटवर पाहून करू शकता.