देहरादून : लिंबाचा वापर जवळपास प्रत्येक किचनमध्ये होतो. आपण विविध पदार्थांमध्ये लिंबाचा रस वापरतो. नुसत्या लिंबूपाण्यामुळेच शरीर ऊर्जावान होतं. लिंबाच्या रसाचे फायदे आपल्याला माहित असतीलच, पण त्याची साल आपण सहसा फेकून देतो. मात्र ही साल शरिरासाठी जास्त उपयुक्त असते.
विशेषतः हिरड्यांमध्ये आलेली सूज आणि दातांना लागलेली कीड दूर होते. शिवाय त्वचेसाठीसुद्धा ही साल गुणकारी असते. तसंच लिंबाची साल घालून उकळलेलं पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
हेही वाचा : पावसाळ्यात फळं खरेदीबाबत महत्त्वाच्या टिप्स; नाहीतर सोबत आणाल आजार!
उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनमधील डॉक्टर सिराज सिद्दीकी सांगतात, लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी 6चा हा उत्तम स्रोत आहे. यात आयर्न, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमही भरपूर असतं. खरंतर हे पौष्टिक तत्त्व जास्तीत जास्त लिंबाच्या सालीतून मिळतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबात व्हिटॅमिन सी असल्यानं रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहतेच, शिवाय रक्तही पातळ होतं. ज्यामुळे हार्ट ब्लॉकेजचा त्रास दूर राहतो. लिंबाच्या सालीचा स्क्रब चेहऱ्याला लावल्यास पिंपल, डाग दूर होतात. स्किन टॅनिंगही कमी होते.
हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा दातांना कीड लागली असेल तर लिंबाच्या सालीच्या पावडरने दात घासल्यास आराम मिळतो. केसांमध्ये कोंडा झाला असेल. तर त्यावर ताज्या लिंबाच्या सालीची पेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कोंडा कमी होतो आणि केसांना भरपूर पोषण मिळतं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
