मासिकपाळीतील वेदना, अनियमितपणा, सगळ्यावर उपाय; 1 देखणं फूल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
या फुलांच्या पानांच्या वापरामुळे पीएच लेव्हल व्यवस्थित राहते. ज्यामुळे केस मऊ होतात. केसांमध्ये कोंडा होत नाही. तसंच केसांची वाढही व्यवस्थित होते.
दिक्षा बिष्ट, प्रतिनिधी
हल्द्वानी : जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला प्रिय आहे, असं म्हणतात. शिवाय ते दिसायलाही सुरेख दिसतं. म्हणूनच अनेकजण या फुलाच्या रोपाची लागवड आपल्या खिडकीत किंवा अंगणात करतात. परंतु आयुर्वेदातही या फुलाचे अनेक फायदे दिलेले आहेत. पूजेमध्ये वापरलं जाणारं हे जास्वंद आरोग्यासाठी कसं फायदेशीर असतं, हे आज आपण पाहणार आहोत. याबाबत डॉ. आशुतोष पंत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि काही केल्या वजन कमीच होत नसेल, तर जास्वंदाचं फूल हा आपल्यासाठी रामबाण उपाय आहे. या फुलाच्या पानांचा चहा प्यायल्यास शरीर ऊर्जावान राहतं आणि लवकर भूक लागत नाही. बराच वेळ पोट भरलेलं राहतं. परिणामी हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
डॉ. पंत यांनी सांगितलं की, जास्वंदाचे केसांसाठीही अनेक फायदे आहेत. या फुलांच्या पानांच्या वापरामुळे पीएच लेव्हल व्यवस्थित राहते. ज्यामुळे केस मऊ होतात. केसांमध्ये कोंडा होत नाही. तसंच केसांची वाढही व्यवस्थित होते. एकूणच केसांना पोषण मिळतं.
मासिकपाळीचं चक्र नियमित होण्यासाठीसुद्धा जास्वंदाच्या पानांचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पाळीसंबंधातील सर्व समस्या दूर होतात. डॉक्टरांनी सांगितलं की, मासिकपाळीदरम्यान वेदना होणं सामान्य आहे. मात्र जर हा त्रास असह्य झाला, तर जास्वंदाचा चहा फायदेशीर ठरू शकतो. जास्वंदाच्या 2 कळ्यांचं दररोज सकाळी उपाशीपोटी सेवन करणंही उपयुक्त ठरतं. हा उपाय आठवडाभर करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Haldwani Talli,Nainital,Uttarakhand
First Published :
August 06, 2024 6:34 PM IST