काही लोक मुल होत नाही म्हणून स्त्रीयांना दोषी मानतात. पण कधीकधी त्यामागे पुरेसा स्पर्म काउट न असणे हे देखील मुलं न होण्याचं कारण असू शकतात.
ह्युमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या ४५ वर्षांत शुक्राणूंची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम भारतातील पुरुषांवर होताना दिसत आहे.
advertisement
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे ही चिंतेची बाब आहे. यामुळे पुरुष वंध्यत्वाचे शिकार होऊ शकतात. हे इतके धोकादायक असू शकते की त्यावर वेळीच उपचार न केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.
शुक्राणूंची संख्या वाढवण्याचे अनेक मार्ग असू शकतात परंतु एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे शुक्राणूंची संख्या वेगाने वाढू शकते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्वयंपाकघरात उपस्थित लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी लसूण खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढते आणि त्याची गुणवत्ता देखील सुधारते.
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी लसूण कसे उपयुक्त आहे?
लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक संयुग असते, जे शुक्राणूंची संख्या वाढविण्यात खूप मदत करते. याशिवाय, लसणात सेलेनियम आढळते जे शुक्राणूंची गतिशीलता सुधारते. लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या चावून खाऊ शकता. कच्चा लसूण खाणे जास्त फायदेशीर आहे. भाजी आणि इतर गोष्टींसोबतही खाऊ शकतो.
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा
- चिया, भोपळा आणि फ्लेक्ससीड खा.
- काजू, बदाम, अक्रोड, अंजीर खा.
- पालक, ब्रोकोली, मेथी यांसारख्या लोहयुक्त भाज्या खा.
- अंडी आणि फॅटी फिश
- केळी
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज १७ मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)