तांब्याच्या बाटल्या खूप फायदेशीर मानल्या जातात. तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात नैसर्गिकरित्या अँटी-इन्फेक्शन गुणधर्म येतात. तांब्यामध्ये अद्वितीय गुणधर्म असतात, जे जीवाणू मारण्यास आणि शरीराला हानिकारक घटकांपासून वाचवण्यास मदत करतात. तांब्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारतं, आतड्यांचे आरोग्य सुधारतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
Health Risk Of The Day : वारंवार चेहरा धुणं वाटते चांगली सवय, पण डॉक्टरांनी सांगितले याचे दुष्परिणाम
advertisement
तांब्याचं पाणी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतं, जे शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात. हे थायरॉईड आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतं.
आहारतज्ज्ञ डॉ. श्वेता शहा पांचाल म्हणाल्या, मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून कॉपरचे आरोग्याला खूप फायदे आहेत. पचन, रोगप्रतिकारक शक्ती, मेटाबोलिझम, थायरॉईड या सगळ्या गोष्टीत मदत करतं. पण दिवसभर तांब्याच्या बाटलीतून पाणी पित असाल तर शरीरात तांब्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं. यामुळे मळमळ, पोटात वेदना, उलटी अशी लक्षणं दिसू शकता. यकृतावरही कॉपरचा खूप दाब येतो. त्यामुळे तांब्याच्या बाटलीतील पाणी एक सप्लिमेंट म्हणून प्या. दिवसभर पिऊ नका. तांब्याच्या भांड्यातील 1-2 ग्लास पाणी दिवसभर पुरेसं आहे, तुमच्या शरीराला इतक्याच कॉपरची गरज आहे.
शाहरूख-रणबीर, आलिया-दीपिका हसतात, तशी स्माईल आपल्यालाही करता येऊ शकते का?
आहारतज्ज्ञ डॉ. श्वेता शहा पांचाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
तांब्याची बाटलीतील पाणी पिताना काय काळजी घ्यायची?
1) तुम्ही तांब्याची बाटली वापरत असाल तर ती दररोज नीट स्वच्छ करा. बऱ्याच वेळा बाटलीचा वरचा भाग इतका लहान असतो की तो साफ करणं कठीण असतं. त्यामुळे बाटली खरेदी करताना ती रुंद असेल असं बघा, जेणेकरून बाटलीचा प्रत्येक कोपरा ब्रशने पूर्णपणे स्वच्छ करता येईल.
2) आजकाल तांब्याच्या अशा बाटल्याही बाजारात विकल्या जातात, ज्यात धातूची भेसळ केलेली असते. अनेक बाटल्या आतून तांब्याच्या बनवलेल्या नसतात, त्याऐवजी दुसराच धातू वापरलेला असतो, त्यामुळे तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी खूप नुकसान होऊ शकतं. तुम्ही जर तांब्याची बाटली विकत घेत असाल तरी काळजीपूर्वक विचार करून चांगल्या ब्रँडची खरेदी करावी.
3) तांब्याच्या भांड्यात चार ते पाच तास ठेवल्यानंतर पाणी प्यायला हवं आणि रोज सकाळी तुम्ही फक्त एक ग्लास पाणी पित असाल तर जास्तीत जास्त 12 तास ठेवलेले पाणी पिऊ शकता. पण बाटलीमध्ये पाणी बराच काळ ठेवून तेच पाणी सतत प्यायल्याने शरीरातील तांब्याचे प्रमाण वाढून आरोग्याला हानी पोहोचू शकते.