Health Risk Of The Day : वारंवार चेहरा धुणं वाटते चांगली सवय, पण डॉक्टरांनी सांगितले याचे दुष्परिणाम

Last Updated:

Side Effect Of Washing Face : कोणतीही गोष्ट अति किंवा जास्त वाईटच. मग चेहरा धुणंही याला अपवाद नाही. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही  सतत धूत असला पण याचे काही दुष्परिणाम आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : कित्येक लोक असे आहेत जे सतत चेहरा धुत राहतात. काही जण साबण लावून तर काही फक्त पाण्याने. चेहरा सतत धुतल्याने चेहऱ्यावर घाण, धूळ वगैरे काही राहत नाही, चेहरा स्वच्छ होतो आणि चेहऱ्याच्या समस्या उद्भवणार नाहीत असं वाटतं. चेहरा धुणं किंवा स्वच्छ करणं ही चांगली सवय. पण सतत चेहरा धुणं बिलकुल चांगलं नाही असं तज्ज्ञ सांगतात.
कोणतीही गोष्ट अति किंवा जास्त वाईटच. मग चेहरा धुणंही याला अपवाद नाही. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही  सतत धुत असला पण याचे काही दुष्परिणाम आहेत. याबाबत त्वचारोग तज्ज्ञांनीच माहिती दिली आहे. आता हे दुष्परिणाम काय आहे ते पाहुयात.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, खूप वेळा चेहरा धुतल्याने आपला चेहरा स्वच्छ आणि चांगला राहतो, असा समज आहे. पण असं अजिबात नाही. बरेच जण साबणाने सारखा सारखा चेहरा धुत राहतात पण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेलच निघून जातं, स्किन बॅरिअर डिस्टर्ब होतं, त्वचा काळवंडते, पीएच लेव्हल डिस्टर्ब होतं. सारखा सारखा चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी परते, स्किन बॅरिअर डिस्टर्ब झाल्याने अॅक्नेही येऊ शकतात.
advertisement
सारखा चेहरा धुतल्याने त्वचा सुंदर नाही राहत योग्यरित्या मॉईश्चराइझ करणं आणि सन प्रोटेक्शनही तितकंच महत्त्वाचं आहे. असा सल्ला स्किन स्पेशालिस्ट डॉ. योगिता रोहकले यांनी दिला आहे. एका पॉडकास्टवर त्यांनी ही माहिती दिली.
चेहरा धुताना काय काळजी घ्यायची?
1) जास्तीत जास्त स्किन टाइप्सच्या लोकांना दिवसातून दोन वेळा सकाळी व रात्री चेहरा धुण्यास सांगितलं जातं. सकाळी चेहरा धुणं ही स्किन केअरची पहिली स्टेप आहे, त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराययर व सिरम लावून घराबाहेर पडता येतं.
advertisement
2) त्यानंतरच चेहऱ्यावर मेकअप लावता येतो. दिवसभरातील घाण व चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स निघून जावे यासाठी रात्री चेहरा धुण्याचा सल्ला दिला जातो. चेहरा कसा धुवावा चेहरा धुण्याचा पहिला नियम म्हणजे कधीही गरम पाण्याने चेहरा धुवू नये.
3) चेहरा धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाणी वापरावे. तसेच योग्य क्लिन्झर निवडणंही आवश्यक आहे. सर्वात आधी चेहरा पाण्याने ओला करा आणि नंतर सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजेच बोट गोलाकार फिरवत चेहऱ्याच्या टी-झोन आणि जो लाइन्सपासून पूर्ण चेहऱ्यावर क्लिन्झर घासून घ्या.
advertisement
4) क्लिन्झर किंवा फेस वॉश चेहऱ्यावर 30 सेकंद चोळता येते. मग चेहरा पाण्याने धुवा आणि स्वच्छ करा. टॉवेल वापरणं टाळा आणि स्वच्छ कापडाने चेहरा स्वच्छ करा. चेहरा टॉवेलने घासून पुसू नका.
5) तुम्ही संध्याकाळी चेहरा धुत असाल तर आधी चेहऱ्यावरचा मेकअप काढा. मेकअप रिमूव्हरच्या मदतीने चेहऱ्यावरील काजळ, लिपस्टिक, फाउंडेशन आणि मस्करा काढून टाका. यानंतरच चेहरा धुवा.
advertisement
6) तेलकट त्वचेसाठी टिप्स जास्त तेलकट त्वचेमुळे वैतागलेले लोक कच्च्या दुधाने आपला चेहरा स्वच्छ करू शकतात. एका भांड्यात कच्चे दूध घेऊन त्यात कापूस बुडवून चेहरा स्वच्छ करा. हे डेड स्कीन सेल्स व जास्तीचे तेल दोन्ही काढून टाकते. यानंतर फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे दिवसभर चेहरा तेलकट राहणार नाही.
मराठी बातम्या/Viral/
Health Risk Of The Day : वारंवार चेहरा धुणं वाटते चांगली सवय, पण डॉक्टरांनी सांगितले याचे दुष्परिणाम
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement