Health Risk Of The Day : सलाड बिलकुल खाऊ नका, तज्ज्ञांनी का दिला असा सल्ला? सांगितला धोका

Last Updated:

Salad side effect : सलाड खाणं आरोग्यासाठी चांगलं, त्याचे फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पण याचे दुष्परिणामही असू शकतात याचा तुम्ही कधी विचार केला होता का?

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
नवी दिल्ली : जेवताना अनेकांना सलाड खायची सवय असते. यात काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा यांचा समावेश असतो. सलाड म्हणजे हेल्दी असंच अनेकांना वाटतं. पण तज्ज्ञांनी मात्र सलाड बिलकुल खाऊ नका असा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी याचे दुष्परिणाम सांगितले आहेत. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण तज्ज्ञ नेमकं काय म्हणाले ते पाहुयात.
सलाड खाणं आरोग्यासाठी चांगलं, त्याचे फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पण याचे दुष्परिणामही असू शकतात याचा तुम्ही कधी विचार केला होता का? तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदाने सलाड निषिद्ध सांगितला आहे. अन्नपाणी विद्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही कच्च्या भाज्या खायच्या नाहीत.
advertisement
तज्ज्ञ म्हणाले तुमचे आईबाबा, आजीआजोबांना विचारा ते किती भाज्या खात होते, नव्हते खात किंवा अगदी कमी प्रमाणात. आता भाज्यांचं कंटनेर मोठं असतं आणि बाकी पदार्थ डाळी वगैरे आपण थोडं थोडं खातो.
नाइटशेड व्हेजिटेबल म्हणजे भाज्यांचा विशिष्ट ग्रुप ज्यात काकडी, टोमॅटो, ढोबळी मिरची वगैरे येतात. तर काही शेंगा आहेत, डाळी आहेत यात लेक्टिन्सचं प्रमाण खूप जास्त असतं. हे लेक्टिन्स किंवा फायटो केमिकल्स असतात. हे यासाठी असतात की प्राण्यांनी ते खाऊ नये. भाज्यांचं स्वतःला सुरक्षित करण्याचं हे एक मेकॅनिझम आहे. पण आपण ते खातो. आपलं लहान आतडं त्यात टाइट जंक्शन्स असतात, जे कोणतेही अँटिजन्स किंवा विषाक्त पदार्थ रक्तप्रवाहात जाऊ नयेत, यासाठी बॅरिअर्स किंवा फिल्टर्स असतात.  हे टाइट जंक्शन्स कच्च्या भाज्या लूझ करतात.
advertisement
कच्च्या भाज्या नाही खायच्या मग फायबर कसं घ्यायचं, तर भाज्या थोड्या परतून खा, उकडून खा. उकडून म्हणजे शिजवून नाही तर त्या प्रेशर कुक असाव्यात. शेंगा, कडधान्य आणि डाळी हे प्रेशर कुक असाव्यात म्हणजे लेक्टिन त्यात डिझॉल्व्ह होऊन जातं", असं आयुर्वेदिक डॉक्टर मुकुंग सबनीस यांनी एका पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली आहे.
advertisement
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने फक्त माहितीसाठी दिला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : सलाड बिलकुल खाऊ नका, तज्ज्ञांनी का दिला असा सल्ला? सांगितला धोका
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement