Health Risk Of The Day : भाजलेल्या जागेवर बर्फ लावल्याने काय होतं?

Last Updated:

Ice on burn skin : त्वचा भाजली की आपली प्रतिक्रिया असते ती म्हणजे लगेच आपण त्यावर थंड बर्फ लावतो. पण भाजलेल्या ठिकाणी थंड बर्फ लावण्याचा काय परिणाम होतो, तुम्ही कधी विचार केला आहे का?

News18
News18
नवी दिल्ली : स्वयंपाक करताना भाजणं काही नवीन नाही. कधी एखादं गरम भांडं उचलताना, चपाती-भाकरी करताना हमखास हात भाजतोच. हात असो वा शरीराचा कोणताही भाग, त्वचा भाजली की आपली प्रतिक्रिया असते ती म्हणजे लगेच आपण त्यावर थंड बर्फ लावतो. पण भाजलेल्या ठिकाणी थंड बर्फ लावण्याचा काय परिणाम होतो, तुम्ही कधी विचार केला आहे का?
त्वचा भाजली की त्याच्यावर चुकूनही बर्फ लावू नये. भाजलेल्या त्वचेवर बर्फ लावण्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. याबाबत डॉक्टरांनीही सावध केलं आहे. आता भाजलेल्या त्वचेवर बर्फ लावल्याने काय होतं, ते पाहुयात.
भाजलेल्या ठिकाणाचं तापमान कमी होतं. ज्यामुळे त्या जागेतील नसा अरुंद होतात हा भागातील रक्तप्रवाह मंदावतो. यामुळे ती जखम बरी होण्याची प्रक्रियाही मंदावते. बर्फामुळे त्वचेची जागा सुन्न होते, ज्यामुळे फ्रॉस्ट बाईक किंवा त्वचेला दुखापत होऊ शकते.
advertisement
डॉ. अश्वनी कुमार सक्सेना यांनी @TheEasyDoctor या त्यांच्या युट्युब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
त्वचा भाजल्यावर या गोष्टी करू नका
जखमेवर टूथपेस्ट, लोणी किंवा घरगुती लोशन कधीही वापरू नका. यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. जखमेवर घट्ट पट्टी बांधू नका, कारण त्यामुळे त्या भागावर दाब येतो आणि जखम भरायला अडथळा निर्माण होऊ शकतो.
advertisement
मग आता त्वचा भाजली तर काय करायचं?
थंड पाण्याने जखम धुवा : भाजल्यावर त्वरित प्रभावित भाग 10-15 मिनिटे थंड (बर्फाचे नाही) पाण्याने धुवा. यामुळे जळजळ कमी होऊ शकते आणि जखमेची तीव्रता कमी होऊ शकते.
मऊ कापडाने पुसा : जखम कोरडी करण्यासाठी मऊ आणि स्वच्छ कापड वापरा. कापडाने घासू नका, तर हलक्या हाताने पुसा, जेणेकरून त्वचेला अधिक हानी होऊ नये.
advertisement
ओषध किंवा अ‍ॅलोवेरा जेल लावा : यानंतर, मेडिकल स्टोअरमध्ये मिळणारी अँटीसेप्टिक क्रीम, जसे की सिल्व्हर सल्फाडायझिन क्रीम लावू शकता. यामुळे जखमेला संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळते आणि बरे होण्यात मदत होते.
डॉक्टरांचा सल्ला घ्या : जर जखम खोल असेल किंवा जळलेल्या ठिकाणी तीव्र वेदना होत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तज्ञांचा सल्ला न घेता कोणतेही घरगुती उपाय किंवा औषधे वापरू नका.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : भाजलेल्या जागेवर बर्फ लावल्याने काय होतं?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement