advertisement

Numerology: मोठ्या अडचणी पण नफा बक्कळ! मूलांक 5, 6, 7, 8, 9 असणाऱ्यांसाठी मार्च महिना कसा असेल?

Last Updated:

Numerology: मार्च महिना अनेकांसाठी खास असणार आहे, या महिन्यात जुळून येणारे योग मूलांकासाठी लाभदायी ठरतील, काही मूलांकाना आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. मार्च महिना अंकशास्त्राच्या दृष्टीने कसा असेल, मूलांक 5, 6, 7, 8, 9 यांचे मासिक अंकशास्त्र पाहुया.

News18
News18
मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
या महिन्यात तुम्हाला थोडं जपून आणि संयमाने वागावं लागेल. जे लोक सायन्स किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. इंटरव्ह्यू किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे पूर्ण योग आहेत. मार्चचा पहिला आणि तिसरा आठवडा तुमच्या फायद्याचा असेल, पण दुसऱ्या आणि चौथ्या भागात मात्र सावध राहा. आरोग्याबद्दल बोलायचं तर, जुन्या आजारांपासून तुमची सुटका होईल. तुमची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम आणि चांगल्या जेवणावर भर द्या.
advertisement
मूलांक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा तुमच्यासाठी खूपच पॉझिटिव्ह असेल. शिक्षणात तुमची गाडी जोरात धावेल आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. खेळ आणि स्पर्धात्मक गोष्टींमध्ये तुम्ही इतरांच्या पुढे राहाल. तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्याच्या बाबतीतही चांगले बदल घडतील, तुमची फिट राहायची जिद्द कामाला येईल. दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मात्र तुम्हाला कामात थोडे जास्तच कष्ट उपसावे लागतील.
advertisement
मूलांक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं तर, वैवाहिक जीवन खूप छान जाईल. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगून जाईल. सासरच्या मंडळींशी तुमचे संबंध सुधारतील आणि घरचं वातावरण एकदम भारी राहील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार सण-समारंभात दंग राहाल. जे सिंगल आहेत, ते महिन्याच्या मध्यात कोणा खास व्यक्तीसमोर आपलं मन मोकळं करू शकतात. जोडप्यांमध्ये थोडे गैरसमज होऊ शकतात, पण महिन्याच्या शेवटी तुम्ही ते समजूतदारपणे सोडवाल. तुमचं आरोग्यही एकदम टकाटक राहील.
advertisement
मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 and 26 तारखेला जन्मलेले लोक)
बिझनेसच्या बाबतीत हा पूर्ण महिना तुमच्यासाठी फायदेशीर असेल, छोट्या-मोठ्या अडचणी येतील पण नफा मात्र चांगला मिळेल. पर्सनल लाईफमध्ये ऑफिसमधल्याच कोणाकडे तरी तुमचं मन ओढलं जाण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे जोडीदाराशी थोडे खटके उडू शकतात. लगेच रागवणं तुम्हाला महागात पडू शकतं, त्यामुळे शांत राहा. महिन्याच्या शेवटच्या दिवसात संवाद कमी झाल्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो, तो वेळीच मिटवा. तुमची झोप थोडी विस्कळीत होऊ शकते, पण एनर्जी लेव्हल मात्र हाय राहील.
advertisement
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
महिन्याच्या मध्यात ऑफिसमध्ये काही लोक तुमच्यावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतील, पण बॉसशी तुमचे संबंध सुधारतील. व्यावसायिकांसाठी महिन्याचा शेवट एखादी नवीन आणि मोठी डील घेऊन येऊ शकतो. पर्सनल लाईफमध्ये जे सिंगल आहेत, ते एखाद्या मित्राच्या प्रेमात पडू शकतात. फॅमिली वाढवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच लकी आहे. मुलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन बनतील. महिन्याच्या शेवटी सासरच्या लोकांशी पटायला लागेल, ज्यामुळे घरात शांतता राहील. आरोग्याच्या बाबतीत हा महिना ठीकठाक असेल.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: मोठ्या अडचणी पण नफा बक्कळ! मूलांक 5, 6, 7, 8, 9 असणाऱ्यांसाठी मार्च महिना कसा असेल?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement