Holi 2026: होळी पेटवण्याचा नेमका मुहूर्त कधी? चंद्रग्रहण-भद्रकाळ! महाराष्ट्रासह या राज्यात दिसणार असल्यानं...
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Holi 2026: होळी पेटवण्याच्या मुहूर्ताबद्दल यंदा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. कारण 2 मार्चला भद्रा आहे आणि 3 मार्चला ग्रहण. फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 वाजता सुरू होऊन 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 वाजता संपणार आहे. ज्योतिषांच्या मते...
मुंबई : यंदा होळीचा सण एका वेगळ्या आणि दुर्मिळ योगायोगामुळे गाजणार आहे. होळी पेटवून त्याभोवती ओरडत फिरण्यासाठी लहान मुलांमध्ये उत्सुकता आहे. होळीला तब्बल 100 वर्षांनंतर असा संयोग जुळून आला असून होळीवर ग्रहणाचे सावट असेल. त्यामुळेच यंदाची पूजा आणि मुहूर्ताची गणिते थोडी बदलणार आहेत.
या ग्रहणाची वेळ आणि सूतक काळाचा विचार करता, 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 मिनिटांनी वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुरू होईल आणि ते संध्याकाळी 6:47 मिनिटांपर्यंत चालेल. ग्रहणाच्या 9 तास आधीपासूनच म्हणजे सकाळी 6:20 पासून सूतक काळ सुरू होईल. धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळात मंदिरे बंद असतात आणि कोणत्याही प्रकारचे पूजन केले जात नाही. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे ग्रहण चंद्रोदयाच्या वेळी सुमारे 30 ते 35 मिनिटे दिसणार आहे.
advertisement
होळी पेटवण्याच्या मुहूर्ताबद्दल यंदा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. कारण 2 मार्चला भद्रा आहे आणि 3 मार्चला ग्रहण. फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 वाजता सुरू होऊन 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 वाजता संपणार आहे. ज्योतिषांच्या मते, होळी पेटवणे भद्रा आणि सूतक विरहित काळात करणे श्रेष्ठ असते, जेणेकरून त्याचा शुभ परिणाम कुटुंबाला मिळतो.
advertisement
हरिद्वारचे ज्योतिषाचार्य पंडित प्रतीक मिश्रा यांच्या मार्गदर्शनानुसार, अशा दुर्मिळ स्थितीत दोन प्रकारे निर्णय घेता येतो. काही पंचांगानुसार 2 मार्चला भद्रेत होळी दहन करता येईल, पण अधिक सुरक्षित मार्ग म्हणजे 3 मार्चला ग्रहणाचे सूतक संपल्यानंतर दहन करणे. 3 मार्चला जरी संध्याकाळी 5:07 ला पौर्णिमा संपत असली, तरी त्या दिवशी उदय तिथी पौर्णिमेचीच असल्याने संध्याकाळी 6:48 ते 8:50 या वेळेत होलिका दहन करणेही योग्य ठरेल.
advertisement
महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी होळीची पूजा कधी करावी? तर पूजेसाठी 2 मार्च हाच दिवस उत्तम आहे. कारण 3 मार्चच्या पहाटेपासूनच सूतक काळ सुरू होईल आणि त्या काळात देवाची पूजा करता येत नाही. त्यामुळे सुख-समृद्धीसाठी केल्या जाणाऱ्या होळीच्या पूजेचे विधी 2 मार्चलाच उरकून घेणे सोयीचे ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 7:39 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Holi 2026: होळी पेटवण्याचा नेमका मुहूर्त कधी? चंद्रग्रहण-भद्रकाळ! महाराष्ट्रासह या राज्यात दिसणार असल्यानं...






