बायोलॉजिकल क्लॉक
आपले शरीर 24 तासांच्या सर्कॅडियन लयवर काम करते. हे आपल्या हार्मोन्सची पातळी, रक्तदाब आणि हृदयगती नियंत्रित करते. रात्री शरीर विश्रांती घेते, परंतु सकाळच्या वेळेत शरीरात बदल होतात. जसे की रक्तदाब आणि अचानक हृदयाची गती वाढणे. म्हणूनच ज्या लोकांना आधीच कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो किंवा ज्यांच्या नसांमध्ये प्लाक जमा होतात किंवा हाय ब्लड प्रेशरची समस्या असते. त्या लोकांसाठी हा काळ खूप धोकादायक असतो.
advertisement
रात्री रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका
झोपेच्या वेळी रक्ताभिसरण मंदावते. प्लेटलेट्स अनेकदा एकत्र जमतात, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. जर या गुठळ्या तुमच्या हृदयाच्या धमन्या ब्लॉक करत असतील तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
ताण आणि झोपेची गुणवत्ता
आजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि चिंता अनेकदा आपल्या झोपेवर परिणाम करतात. अनेकांना व्यवस्थित झोपणे कठीण जाते किंवा वारंवार जाग येत असल्याने झोप मोड होते. स्लीप एपनियासारख्या झोपेच्या विकारांमुळे देखील वारंवार झोपेचा त्रास होतो. यामुळे हृदयावर अनावश्यक ताण येतो आणि रात्री हृदयविकाराचा धोका वाढतो.
शरीराची स्थिती
जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर आरामदायी स्थितीत असते. या काळात आपल्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास मंदावतो. जर एखाद्या व्यक्तीला आधीच श्वास घेण्यात अडथळा किंवा हृदयाची समस्या असेल, तर अचानक होणारी कोणतीही क्रिया किंवा हालचाल हृदयावर दबाव आणू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
जीवनशैली आणि अन्न
जड जेवण खाणे, उशिरापर्यंत जागणे, मद्यपान करणे किंवा धूम्रपान करणे यासारख्या सवयींमुळे रात्री हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. अस्वस्थ जीवनशैलीमुळे हृदय कमकुवत होते आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.
हृदयविकार रोखण्यासाठी उपाय
नियमित वेळी झोपा आणि पुरेशी झोप घ्या, किमान 7 तास.
ताणतणाव व्यवस्थापित करण्यासाठी योग आणि ध्यानाची मदत घ्या.
संतुलित आणि हलके जेवण घ्या, विशेषतः रात्री.
नियमित व्यायाम करा आणि चालत जा.
धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर रहा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)