दिवाळीच्या गडबडीत पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळही नसतो. त्वचा चमकदार दिसायला हवी असेल तर घरच्या घरी फेस पॅक बनवून लावता येतात. हे फेस पॅक बनवायला सोपे आहेत.
Hair Care - दिवाळीत घ्या केसांची काळजी, स्ट्रेटनरशिवायही केस दिसतील सरळ, या टिप्सचा नक्की करा वापर
हळद आणि दही फेस पॅक -
हळद आणि दह्याचा फेस पॅक चेहऱ्यासाठी उत्तम मानला जातो. हळद आणि दह्याचा फेस पॅक बनवण्यासाठी
advertisement
2 चमचे दह्यात एक चमचा हळद मिसळा आणि हा पॅक तयार करा. हा तयार केलेला फेस पॅक 15 ते 20
मिनिटं चेहऱ्यावर लावला आणि नंतर धुवून काढा. या फेसपॅक मधून चेहऱ्याला लॅक्टिक ॲसिड मिळतं आणि
त्वचाही टवटवीत होते.
मध आणि दालचिनी फेस पॅक -
हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे मध आणि एक चमचा दालचिनी पावडर मिसळा. हे मिश्रण
चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर धुवा. त्वचेला दाहक-विरोधी गुणधर्म मिळतात आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांमुळे त्वचेवर फोड येण्याची समस्या जाणवत नाही.
गुलाबासारखी मऊ त्वचा हवी? फॉलो करा टिप्स, चेहरा चमकेल दिवसभर
कोरफड आणि हळद फेस पॅक -
या फेस पॅकमुळे चेहऱ्याला झटपट ग्लो तर मिळतोच पण तो बनवण्यासाठी कोणतेही जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. एक चमचा कोरफडीचा गर घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटं लावून ठेवा आणि नंतर धुवा. चेहऱ्याला आर्द्रता मिळते आणि चेहरा चमकदार दिसतो.
बेसन, दही आणि हळद यांचा फेस पॅक -
दोन चमचे बेसनामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा दही मिसळून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर चेहरा धुवून हलक्या हातानं स्वच्छ करा. यामुळे, चेहऱ्यावरील मृत पेशीही काढल्या जातात.
कोणताही फेस पॅक लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा !