गुलाबासारखी मऊ त्वचा हवी? फॉलो करा टिप्स, चेहरा चमकेल दिवसभर

Last Updated:
आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर जणू मळाचे थर जमतात आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्याची खरी चमक टिकवून ठेवण्यासाठी काळजी घ्यायलाच हवी. नेमकं करायचं काय याबाबत मेकअप आर्टिस्ट सरिता प्रजापत यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. (काजल मनोहर, प्रतिनिधी / जयपूर)
1/5
लिंबू आणि गुलाबपाणी चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतं. यानं 10 मिनिटं चेहऱ्याला मसाज करावी. मग 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यावा. दररोज हा उपाय केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं. 

advertisement
2/5
चेहरा खूपच निस्तेज झाला असेल तर कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याआधी गुलाबपाणी लावून वरून काकडीचा काप चोळावा. त्यावर मिल्क क्रीम आणि गुलाबपाण्याच्या पेस्टनं 5 मिनिटं मसाज करावी. आता कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे चेहरा दिवसभर छान चमकदार दिसू शकतो. 

3/5
चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी 2 चमचे चंदन पावडरमध्ये अर्धा कप गुलाबपाणी आणि चमचाभर हळद मिसळा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून 30 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. 

4/5
पिंपल दूर करण्यासाठी 2 चमचे ग्रीन टी व्यवस्थित फेटाळा. त्यात चमचाभर दही मिसळा. हे पॅक चेहरा आणि मानेला लावा. 10 मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवून घ्या. पिंपल घालवण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे, असं मेकअप आर्टिस्ट सरिता प्रजापत यांनी सांगितलं.

5/5
सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement