TRENDING:

Hangover Relief Tips : थर्टी फस्ट आहे 'संडे'ला, पण 'मंडे'ला हँगओव्हर कसा उतरवायचा? आताच वाचून करा प्लॅन

Last Updated:

31 डिसेंबर रोजी प्यायलेल्या दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
2024 हे नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतात. काहीजण यादिवशी आपल्या मित्रमंडळींसोबत मद्यपेय पिण्यास आनंद मानतात. यंदा 31 डिसेंबर रोजी रविवार आल्याने बहुतेक ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठमोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जाईल. परंतु दुसऱ्याच दिवशी सोमवार असल्याने अनेक नोकरदार व्यक्तींना आपल्या कामावर रुजू व्हावं लागेल. तेव्हा 31 डिसेंबर रोजी प्यायलेल्या दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
थर्टी फस्ट आहे 'संडे'ला, पण 'मंडे'ला हँगओव्हर कसा उतरवायचा? आताच वाचून करा प्लॅन
थर्टी फस्ट आहे 'संडे'ला, पण 'मंडे'ला हँगओव्हर कसा उतरवायचा? आताच वाचून करा प्लॅन
advertisement

1. हॅंगओव्हर उतरवण्यासाठी संत्र्याचा रस घेऊ शकता. संत्र्याच्या रसात व्हिटॅमिन सी असल्यामुळे उलटी, मळमळ यापासून आराम मिळतो.

2. हॅंगओव्हरपासून बचावासाठी तुम्ही मद्यपान करण्यापूर्वी काही वेळ आधी केळे देखील खाऊ शकता. यामुळे पोटॅशियम, कार्बोहायट्रेड शरीराला रिहाईड्रेट ठेवतात.

3. हॅंगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी हा लोकप्रिय उपाय आहे. एक कप कडक कॉफी प्यायल्याने हॅंगओव्हर निघून जाते. एकाच वेळी कॉफी पिण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने अर्धा अर्धा कप कॉफी प्या. यामुळे सुस्ती दूर होऊन डोकेदुखीवर आराम मिळतो.

advertisement

बिअर, विस्की की वाईन, 31 च्या पार्टीसाठी कोणता पर्याय बेस्ट?

4. दारूची नशा उतरवण्यासाठी आल्याचा चहा देखील पिऊ शकता. यामुळे डोकेदुखीवर देखील आराम मिळेल.

5. दह्यापासून बनलेली लस्सी हॅंगओव्हर उतरवण्यास मदत करते.

6. नारळाचे पाणी देखील हॅंगओव्हर उतरवण्यासाठी योग्य ठरू शकते.

(वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hangover Relief Tips : थर्टी फस्ट आहे 'संडे'ला, पण 'मंडे'ला हँगओव्हर कसा उतरवायचा? आताच वाचून करा प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल