बिअर, विस्की की वाईन, 31 च्या पार्टीसाठी कोणता पर्याय बेस्ट?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदय, किडनी, फुफ्फुस, स्वादुपिंड, मेंदू आणि लैंगिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य असेल, तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टीत ड्रिकिंग आणि स्मोकिंग टाळा
मुंबई, 26 डिसेंबर : 2023 या वर्षातला शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिना संपत आला आहे. सध्या अनेक जण ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीमध्ये मग्न आहेत. अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीजमध्ये भरपूर मद्यपान करतात. जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने हँगओव्हर आणि डोकेदुखीसारख्या तात्पुरत्या समस्यांव्यतिरिक्त आरोग्याच्या काही दीर्घकालीन समस्याही जाणवू शकतात.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदय, किडनी, फुफ्फुस, स्वादुपिंड, मेंदू आणि लैंगिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य असेल, तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टीत ड्रिकिंग आणि स्मोकिंग टाळा. ड्रिंक टाळणं शक्य नसेल तर बिअर, तकीला, रम, व्हिस्की, ब्रँडी किंवा व्होडका याऐवजी वाइनची निवड करू शकता.
- इतर अल्कोहोलिक पेयांपेक्षा वाइन कमी हानिकारक : इतर अल्कोहोलिक पेयांपेक्षा वाइन, विशेषतः रेड वाइन कमी हानिकारक असल्याचं मानलं जातं. वाइनमध्ये नायट्रोसॅमाइन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. चयापचय झाल्यानंतर नायट्रोसॅमाइन्स या घटकाचं कार्सिनोजेनिक घटकांमध्ये रूपांतर होतं. बिअरसारख्या इतर अल्कोहोलिक पेयांमध्ये या हानिकारक घटकाचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं मानलं जातं.
advertisement
- वाइनमध्ये चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात : अँटिऑक्सिडंट्सच्या जास्त प्रमाणाामुळे रेड वाइन हे आरोग्यदायी अल्कोहोलिक पेय मानलं जातं. अँटिऑक्सिडंट्स शरीरातल्या पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. रेड वाइनमध्ये पॉलिफेनॉल नावाची अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामधून शरीराला लिपिड प्रोफाइल, ब्लड प्रेशर कंट्रोल आणि इन्सुलिन रेझिटन्स यांसारखे विविध आरोग्यदायी उपयोग होतात.
- वाइनचे इतर आरोग्यदायी फायदे : योग्य प्रमाणात प्यायल्यास रेड वाइनचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. रिसर्चमध्ये असं आढळलं आहे, की योग्य प्रमाणात रेड वाइन प्यायल्यास शरीरातल्या बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, रक्ताच्या गाठी होण्यास प्रतिबंध होतो आणि हृदय निरोगी राहतं. द्राक्षाच्या सालीमध्ये आढळणारं रेस्वेराट्रोल हे अँटिऑक्सिडंट डायबेटीस असलेल्यांच्या रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं. रेड वाइनचं नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने बेसल सेल, कोलन, प्रोस्ट्रेट कार्सिनोमा आणि अंडाशयाच्या कर्करोगासह इतक काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो. संशोधन असंही सूचित करतं, की रेड वाइनमधले पॉलिफेनॉल्स प्रीबायोटिक्स म्हणून कार्य करू शकतात.
advertisement
- वाइन प्यायल्याने आयुर्मान वाढू शकतं : वाइन प्यायल्याने काही जुनाट आजारांचा धोका कमी करून आयुर्मान वाढण्यास मदत होऊ शकते. काही संशोधकांचा असा विश्वास आहे, की मध्यम प्रमाणात रेड वाइन प्यायल्यास शरीरातल्या दीर्घायुष्याशी संबंधित जीन्सचं एक्स्प्रेशन वाढू शकतं.
व्हाइट वाइनपेक्षा रेड वाइन चांगली : रेड वाइन ही द्राक्षं सालींसह आंबवून तयार केली जाते, तर व्हाइट वाइन तयार करताना द्राक्षांची साल काढली जाते. त्यामुळे त्यात व्हाइट वाइनच्या तुलनेत पॉलिफेनॉल रेझवेराट्रोल जास्त प्रमाणात असतं. वाइन रेड असो किंवा व्हाइट, ती जास्त प्रमाणात पिणं आरोग्यासाठी घातकच आहे.
advertisement
(वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2023 9:08 PM IST