TRENDING:

Kitchen Tips : घरातील उंदीर, झुरळं आणि पालही होतील नाहीशा! 2 रुपयांचा कपूर स्वच्छ ठेवेल तुमचं घर

Last Updated:

How to keep rats away from home : आज आम्ही तुम्हाला एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत, जो घरातील झुरळं, उंदीर, पाल, डास आणि माशाही दूर ठेवेल. यासाठी तुम्हाला घरातील काही वस्तू घेऊन एक खास गोळी आणि लिक्विड तयार करायचे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : घरात बऱ्याचदा उंदीर किंवा झुरळांचा वावर वाढतो. अशावेळी आपण रासायनिक वस्तूंचा आधार घेऊन त्यांना घालवू शकतो. पण त्यामुळे दीर्घकाळ झुरळं किंवा उंदीर घरापासून दूर राहात नाही. ते पुन्हा पुन्हा येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत, जो घरातील झुरळं, उंदीर, पाल, डास आणि माशाही दूर ठेवेल.
उंदरांना घरापासून कसे दूर ठेवावे?
उंदरांना घरापासून कसे दूर ठेवावे?
advertisement

यासाठी तुम्हाला घरातील काही वस्तू घेऊन एक खास गोळी आणि लिक्विड तयार करायचे आहे. हे तुम्ही काही वेळातच सहज बनवू शकता. चला पाहूया हा सोपा आणि प्रभावी उपाय..

स्पेशल गोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

2 धूपबत्ती

5 कापूर गोळ्या

1 नॅप्थालीन बॉल

पाणी

गव्हाचे पीठ

अशी बनवा स्पेशल गोळी..

advertisement

- सर्वात आधी 2 धूपबत्ती, 5 कापूर गोळ्या, नॅप्थालीन बॉल घ्या आणि त्याची बारीक पावडर करून घ्या.

- हे तीन घटक एका भांड्यात चांगले मिसळून मिश्रण तयार करा.

- नॅप्थालीन, कापूर आणि उदबत्तीचा तीव्र वास उंदीर आणि कीटकांना सहन होत नाही.

- आता तयार पावडर एका भांड्यात घ्या आणि त्यामध्ये थोडे कोमट पाणी घाला.

advertisement

- हे मिश्रण सुमारे 10 मिनिटे भिजू द्या, म्हणजे सर्व घटक विरघळतील.

- 10 मिनिटांनंतर हे मिश्रण गाळणीतून गाळून घ्या.

- अशाप्रकारे तुमच्याकडे गाळलेले द्रावण आणि गाळणीत उरलेले घन पदार्थ असतात.

घाण पदार्थाचा असा करा वापर..

गाळणीत उरलेलया घन पदार्थांमध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ घाला आणि ते पाणी टाकून मळून घ्या. आता या पिठाचे छोटे गोळे बनवा. हे गोळे जिथे उंदीर जास्त येतात, त्या जागी ठेवा. या गोळ्यांमध्ये असलेल्या कापूर आणि नॅप्थालीनमुळे उंदीर हे खाल्ल्याबरोबर घरातून पळून जातील.

advertisement

उरलेल्या द्रवाचा असं करा वापर..

उरलेले द्रव एका स्प्रे बाटलीत भरा. तुम्ही या स्प्रेचा वापर पाल, झुरळे, माश्या आणि डासांना दूर ठेवण्यासाठी करू शकता. हे मिश्रण घराच्या कोपऱ्यात, सिंकखाली आणि पडद्यांच्या मागे स्प्रे करा. त्याचा तीव्र वास त्यांना आत राहू देणार नाही आणि ते बाहेर पळून जातील.

advertisement

उपाय करताना घ्या काळजी..

घरगुती उपाय असला तरी तो आपल्या अरिगयष्टी हानीकारण ठरू शकतो. म्हणून या गोळ्यांचा वापर शक्यतो रात्री करा. हे गोळे घरातील लहान मुलांच्या नजरेआड ठेवा. पाळीव कुत्रा किंवा मांजर यांना देखील हे गोळे खाऊ देऊ नका. स्प्रे वापरतानाही तो आपल्या नाकातोंडात जाणार नाही याची काळजी घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : घरातील उंदीर, झुरळं आणि पालही होतील नाहीशा! 2 रुपयांचा कपूर स्वच्छ ठेवेल तुमचं घर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल