जाणून घेऊयात गरम पाणी पाण्याचे फायदे
गरम पाणी प्यायल्याने पचन सुधारायला मदत होते. याशिवाय शरीरात पाण्याचं प्रमाण वाढल्याने त्वचाही तजेलदार राहायला मदत होते. गरम पाणी प्यायल्याने पोटाभोवती वाढलेला अतिरिक्त चरबीचा घेर कमी व्हायला मदत होते. कारण गरम पाणी प्यायल्याने शरीराततले अतिरिक्त फॅट्स विरघळून जातात. त्यामुळे बऱ्याच अंशी फॅटलॉस व्हायला मदत होते.
advertisement
गरम पाणी केव्हा प्यावं?
सकाळी उठल्याबरोबर आणि जेवणापूर्वी गरम पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. आंघोळीपूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. जेवणापूर्वी गरम पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक कमी होऊन अतिरिक्त कॅलरीज शरीरात जात नाहीत. गरम पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास दूर व्हायला मदत होते. शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास गरम पाण्याची मदत होते. ज्या महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे अशा महिलांनी नियमितपणे गरम पाण्याचं सेवन केल्यास त्यांच्या पाळी संदर्भातल्या समस्या दूर होऊ शकतात.
गरम पाणी पिताना घ्या 'ही' काळजी
गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे जरी असले तरीही गरम पाणी पिताना काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा गरम पाण्यामुळे शरीराला अपाय देखील होऊ शकतो. मुळातच गरम पाणी हे फार गरम नसावं. जास्त तीव्र गरम पाण्यामुळे घसा आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांना इजा पोहचू शकते. सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात साडेतीन लीटर पाणी प्यावं असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पाण्याचे हे प्रमाण लक्षात घेता तुम्ही दिवसभरातून 4ते 5 ग्लास गरम पाणी पिऊ शकता.
गरम पाण्याने वजन खरंच कमी होतं का ?
आपल्या शरीरात जवळपास 60 ते 70 % पाणी असतं. त्यामुळे गरम पाणी प्यायल्याने अतिरिक्त चरबी विरघळली जाईल. यामुळे सरासरी 2 ते 4 किलो वजन कमी होऊ शकतं. तुमचं वजन तुमच्या BMI पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला जास्त वजन कमी करायचं असेल तर व्यायामाशिवाय तुमच्याकडे कोणता पर्याय नाही.