Risk of Copper water: सावधान! तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी पित आहात ? मग घ्या ‘ही’ काळजी, अन्यथा ते पाणी बनेल विष

Last Updated:

Risk of Copper water: सावधान! तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे आपल्याला फारसे माहिती नाहीत. त्यामुळे त्याच्या तोट्यांची कल्पनाच नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा तांब्याच्या बाटलीतून, पिंपातून, ग्लासमधून पाणी पित असाल तर तुम्हाला ही काळजी घ्यावीच लागेल. नाहीतर पाणी ज्याला आपण जीवन म्हणतो तेच तांब्याच्या भांड्यातलं पाणी तुमच्यासाठी काळ ठरू शकतं.

प्रतिकात्मक फोटो : सावधान! तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना घ्या ‘ही’ काळजी
प्रतिकात्मक फोटो : सावधान! तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना घ्या ‘ही’ काळजी
मुंबई: एक महागडा धातू म्हणून तांब्याची ओळख आहे. तांबं धातू जरी असला तरीही आपल्या शरीरासाठी ते अत्यावश्यक खनिज म्हणून काम करतं. ज्यामुळे हाडांची ताकद वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढून आरोग्य चांगलं राहतं आणि हृदयासाठी सुद्धा तांबं फायद्याचं ठरतं. मात्र आपल्या शरीरात  तांबं बनत नसल्याने तांब्याचे फायदे शरीराला व्हावेत यासाठी तांब्याचा अर्क आपल्याला बाहेरून मिळवावा लागतो. कदाचित या कारणांमुळे आपले पूर्वज तांब्यांची भांडी वापरत होते. मात्र आजच्या मॉडर्न विश्वात तांब्याचा वापर हा फक्त फॅशनपुरता मर्यादित राहिलाय. त्यामुळे सध्या तांब्याच्या बाटलीतून किंवा तांब्याच्या पिंपातून पाणी पिण्याची फॅशन आलीये. फॅशन हा शब्द यासाठी वापरला की प्लॅस्टिकच्या बाटली ऐवजी तांब्याची बाटली वापरली जाऊ लागली आहे. तांब्याच्या बाटलीतून पाणी पिण्याचे फायदे आपल्याला फारसे माहिती नाहीत. त्यामुळे त्याच्या तोट्यांची कल्पनाच नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा तांब्याच्या बाटलीतून, पिंपातून, ग्लासमधून पाणी पित असाल तर तुम्हाला ही काळजी घ्यावीच लागेल. नाहीतर पाणी ज्याला आपण जीवन म्हणतो तेच तांब्याच्या भांड्यातलं पाणी तुमच्यासाठी काळ ठरू शकतं.
Risk of Copper water: सावधान! तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना घ्या ‘ही’ काळजी अन्यथा होईल नुकसान
असं म्हणतात तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ व्हायला मदत होते. तांबं संपूर्ण शरीराला डिटॉक्सिफाय करते. तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने त्वचेला उजळा मिळतो. तांब्याच्या जंतू मारण्याच्या गुणधर्मामुळे तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यात हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. त्यामुळे ते पाणी खऱ्या अर्थाने चांगले असतं. त्यामुळे ते पाणी प्यायल्याने शरीराला फायदाच होतो. दिल्लीतल्या, सर गंगाराम रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. मुक्ता वशिष्ठ म्हणतात की, ‘कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्याने फायद्याऐवजी नुकसान होईल. तांबे हे आपल्या हाडे, मेंदू, त्वचा, ऊती आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. आपल्याला दररोज 10 मिलीग्राम तांब्याची आवश्यकता असते. यापेक्षा कमी तांबं आपल्याला मिळालं तर आपला मेंदू व्यवस्थित काम करू शकणार नाही. ज्याला विपरीत परिणाम शरीराच्या अन्य अवयवांवर होऊ शकतो. तांब्याच्या कमतरतेमुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. जर प्रमाणापेक्षा जास्त तांबं आपल्या शरीरात गेलं  तर ते शरीराच्या विविध भागांमध्ये भागांमध्ये जमा होतं. जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवतो तेव्हा तांब्यांचा अंश त्या पाण्यात उतरायला सुरूवात होते. जे तुमच्या शरीरासाठी फायद्याचं असतं.
advertisement
जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पितो तेव्हा त्यात तांब्याचा अर्क किंवा अंश उतरलेला असतो. पाण्यात तांब्याचं प्रमाण कमी असेल तर काही हरकत नाही, पण हे प्रमाण जर जास्त झालं तर ते पाणी तुमच्साठी धोक्याचं ठरू शकतं. कारण या पाण्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त तांबं असल्यामुळे ते शरीराच्या विविध भागात साचून राहण्याची शक्यता असते. जे एखाद्या विषापेक्षा कमी नसेल.
advertisement

तांब्याचं भांडं स्वच्छ असणं गरेजेचं

डॉ. मुक्ता वशिष्ठ म्हणतात की, ज्या तांब्याच्या भांड्यातून तुम्ही पाणी पिणार आहात ते भांडं स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपल्याला माहितीये की तांब्याची हवे सोबत रासायनिक प्रक्रिया होऊ ते काळं किंवा हिरवं पडतं. अशावेळी त्याचं रूपांतर कॉपर ऑक्साईड किंवा सल्फाईडमध्ये होत असतं.  काळ्या किंवा हिरव्या पडलेल्या भांड्यातलं पाणी पिणं हे आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.याशिवाय तांब्याच्या पाण्याचं भांडं जर व्यवस्थित धुतलं नाही गेलं तर भांड्यातली घाण आपल्या शरीरात जाते. पाण्यातले विषारी पदार्थ आधी पोटात आणि मग रक्तात मिसळले जातील जे मेंदू, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत, हृदय यासारख्या महत्त्वाच्या अवयवांसाठी धोक्याचे ठरू शकतील.
advertisement
Risk of Copper water सावधान! तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना घ्या ‘ही’ काळजी अन्यथा होईल नुकसान

'ही' लक्षणं दिसतात लगेच साफ करा तांब्याचं भांडं

आज अनेकांकडे तांब्याची पिंप किंवा तांब्याचे माठ आहेत. घरात रोज नव्याने पाणी भरलं जातं मात्र तांब्यांचं भांडं साफ होत नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातलं खराब किंवा विषारी पाणी प्यायल्याने जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास झाला तर समजून जा की आता तांब्याचं भाडं साफ करण्याची आणि जर त्यातलं पाणी बरंच जुनं असेल तर ते बदलायची वेळ आलीये. तांब्याचे विषारी पाणी पोटात गेल्यामुळे पोटदुखी, उलटी, जुलाब, मळमळ, यासारखे आजार होऊ शकतात.
advertisement

गरम पाणी आणि तांबं

डॉ. मुक्ता वशिष्ठ म्हणतात, अनेक जण वजन कमी करण्यासाठी किंवा पचन सुरळीत होण्यासाठी गरम पाणी पितात. मात्र तांब्याच्या भांड्यातून गरम पाणी पिण्याची चूक कधीही करू नका. गरम पाण्यात प्यायल्याने तांबं पाण्यात वेगाने विरघळतं जे धोकादायक ठरू शकतं. तुम्ही तांब्यांच्या बाटलीतून पाणी पित असाल तर ती बाटली तुम्हाला रोज लिंबू आणि मिठाने स्वच्छ धुवावी लागेल. तांब्याच्या माठातून जर पाणी पित असाल तर एक दिवसाआड तांब्याचं भांड नीट धुवून घ्या. याशिवाय तांब्यांच्या भांड्यातलं पाणी 6-7 तासात पिऊन संपवा म्हणजे त्यात तांब्याचा अतिरिक्त अर्क येण्याची भीती राहाणार नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Risk of Copper water: सावधान! तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी पित आहात ? मग घ्या ‘ही’ काळजी, अन्यथा ते पाणी बनेल विष
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement