Copper Toxicity : काय असते कॉपर टॉक्सिसिटी? तांब्याची भांडी वापरात असाल तर या गोष्टी माहिती हव्याच!

Last Updated:

बरेच लोक तांब्याच्या भांड्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र हे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. अनेक बाबतीत तांब्याच्या भांड्यात खाणे-पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कॉपर टॉक्सिसिटीच्या साईड इफेक्ट्समुळे लिव्हर डॅमेज आणि किडनीचे आजारदेखील होऊ शकतात.
कॉपर टॉक्सिसिटीच्या साईड इफेक्ट्समुळे लिव्हर डॅमेज आणि किडनीचे आजारदेखील होऊ शकतात.
मुंबई, 9 ऑगस्ट : तांब्याच्या भांड्यात खाणे आणि पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे समजून बरेच लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र हे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. अनेक बाबतीत तांब्याच्या भांड्यात खाणे-पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही खाण्यापिण्यासाठी तांब्याची भांडी वापरत असाल तर त्यामुळे कोणकोणत्या लोकांचे यामुळे नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहित असले पाहिजे. चला जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.
काय असते कॉपर टॉक्सिसिटी?
तांब्याच्या भांड्याच्या भांड्यामुळे कॉपर टॉक्सिसिटी होते. एका हेल्थलाईनमध्ये माहिती दिल्याप्रमाणे एका रिसर्चनुसार, तांब्याच्या भांड्यातील तांब्याचा अर्क जास्त प्रमाणात शरीरात गेल्याने कॉपर टॉक्सिसिटी होऊ शकते. ज्यामुळे उलटी, पोटदुस्कही आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवतात. कॉपर टॉक्सिसिटीच्या साईड इफेक्ट्स मुळे लिव्हर डॅमेज आणि किडनीचे आजारदेखील होऊ शकतात. रिसर्चनुसार, तांब्याच्या भाड्यात जास्त काळ ठेवलेले पाणी प्यायल्याने कॉपर टॉक्सिसिटी होते.
advertisement
अल्सरच्या रुग्णासाठी ठरू शकते त्रास दायक
कोणाच्या पोटात अल्सर असेल किंवा अनेकदा अॅसिडिटीची समस्या असेल. त्यामुळे अशा लोकांनी तांब्याचे भांडे खाण्यासाठी किंवा काहीही पिण्यासाठी वापरू नये. वास्तविक तांब्याचा प्रभाव गरम असतो, ज्यामुळे तुमची समस्या अनेक पटींनी वाढू शकते. कोणत्याही कारणाने तांब्याचे भांडे वापरावे लागत असतील तर त्यासाठी डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
advertisement
किडनीचा त्रास असलेल्यांनी तांब्यातील पाणी पिणे टाळावे
किडनी आणि हृदयाच्या समस्या असल्यास तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला मूत्रपिंड किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही तांब्याच्या भांड्यात खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फक्त पाण्यासाठी वापरा
तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमधून जात नसलात तर तांब्याच्या भांड्यात इतर काहीही खाणे आणि पिणे टाळावे. असे करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणजेच तांब्याची भांडी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी वापरावीत.
advertisement
तांब्याच्या भांड्यात या गोष्टी कधीही खाऊ नका
तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कधीही खाऊ नयेत. यासोबतच तांब्याच्या भांड्यात लोणचे, दही, ताक आणि आंबट पदार्थ खाऊ नयेत. तांब्याच्या भांड्यातील या गोष्टी विषारी असू शकतात आणि तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Copper Toxicity : काय असते कॉपर टॉक्सिसिटी? तांब्याची भांडी वापरात असाल तर या गोष्टी माहिती हव्याच!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement