व्यस्त दिनचर्या आणि अयोग्य जीवनशैली यामुळे कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या सामान्य बनत चालली आहे. रोजच्या वाईट सवयींमुळे आपले हृदय कमकुवत होत चालले आहे. परिणामी हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोकाही वाढत आहे. अशा परिस्थितीत ECG आणि Echo या चाचण्यांची मदत घेतली जाते.
समाजात मान-सन्मान मिळवायचा आहे? चाणाक्य यांनी सांगितलेल्या या खास नीती करा फॉलो
advertisement
बहुतांश डॉक्टर हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी याच चाचण्या करण्याचा सल्ला देतात. मात्र या टेस्ट्स अतिशय महाग असतात. तथापि आपण घरच्याघरी देखील आपल्या हृदयाचे आरोग्य तपासू शकतो. यासाठी आपल्याला कोणत्याही मशिनची गरज नाही. यामुळे आपल्याला सहज कळू शकते की आपले हृदय कमी निरोगी आहे.
हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठीच्या घरगुती टिप्स
रोज ४० पायऱ्या चढा
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जर तुम्ही दररोज ४० पायऱ्या दीड मिनिटांच्या आत चढत असाल आणि यामुळे तुम्हाला धाप लागत नसेल, थकवा जाणव नसेल तर समजून जा की तुमचे हृदय एकदम ठणठणीत आहे. हृदय कमकुवत असल्यास थोड्याशा श्रमाने लगेचच हृदयावरील ताण वाढतो आणि धाप लागते.
कमरेचा आकार तपासा
एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, हृदयाचे आरोग्य किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता तपासण्यासाठी BMI पेक्षाही कमरेचा आकार तपासणे अधिक फायदेशीर ठरू शकते. असे सांगितले जाते की पुरूषांची कंबर ३७ इंच आणि महिलांची कंबर ३१.५ इंच असणे हृदय कमकुवत असण्याचे लक्षण आहे. की पुरूषांची कंबर ४० इंच आणि महिलांची कंबर ३५ इंच असणे असे दर्शवते की तुमच्या हृदयाची स्थिती गंभीर आहे. लठ्ठपणामुळे हृदयावर जोर पडतो, वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हे फॅट नसांमध्ये जमा झाल्यास ते ब्लॉकेजचे कारण बनू शकते.
सर्व टेन्शन होणार दूर, गुरू वक्री झाल्याने बदलणार नशीब, या राशींसाठी आकस्मिक धन लाभाचे योग
तुमची नाडी तपासा
नाडीच्या ठोक्यांना पल्स रेट आणि हार्ट रेट म्हटले जाते. हे ठोके मोजूनही आपण हृदयाचे आरोग्य तपासू शकतो. एका सामान्य वयाच्या क्रियाशील व्यक्तीच्या नाडीचे ठोके एका मिनिटाला ६०-१०० इतके असावेत. कमी हार्ट रेटमुळे धाप लागणे, चक्कर येणे अशा समस्या जाणवू शकतात.