आजकाल स्मार्ट वॉच घालण्याचा ट्रेंड आहे. अशा प्रकारची घड्याळं वेळ दाखवतात सोबतच पल्स रेट आणि दिवसभरात आपण किती पावलं चाललो आहोत, याची देखील नोंद ठेवतात. 'एनडीटीव्ही'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
चालण्याच्या व्यायामाला कोणत्याही साधनाची किंवा प्रशिक्षकाची गरज नसते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चालणं हा कोणत्याही वयात करता येण्यासारखा व्यायाम आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज किती पावलं चाललं पाहिजे, याबाबत नेहमीच दुमत आहे. दिवसाला 10 हजार पावलं चालणं सर्वोत्तम सांगितलं जातं. पण तुमच्या वयानुसार तुम्ही कमी-जास्त चालू शकता.
advertisement
Monkeypox Symptoms: मंकीपॉक्सचा विळखा कसा ओळखावा? ही लक्षणे दिसताच धोका समजून जा
चालण्याचे फायदे
दररोज चालण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज चालल्याने शरीर ॲक्टिव्ह राहतं. डायबेटिस, हार्ट डिसीजेस, स्ट्रोक, लठ्ठपणा, डिप्रेशनसारख्या लाइफस्टाइल संबंधित आजार टाळता येतात. एखाद्याला सांधेदुखीची समस्या असेल तर नियमित चालल्याने वेदनांपासून आराम मिळू शकतो.
एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ज्या व्यक्ती आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा पाच हजारांहून अधिक पावलं चालतात त्या दीर्घायुषी होऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एका व्यक्तीने किती चाललं पाहिजे, याबाबत संशोधन करण्यात आलं. या संशोधनात असं निदर्शनास आलं की, एखादी व्यक्ती सलग दोन वर्षे आठवड्यातून तीन वेळा किमान पाच हजार पावलं चालली तर तिचं आयुष्य आणखी तीन वर्षांनी वाढू शकतं. यामुळे व्यायामाशी संबंधित अतिरिक्त खर्चही जवळपास 13 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
मोबाईलमुळे दूर होणार प्रवासातील मोशन सिकनेसची समस्या, कसं? येथे जाणून घ्या
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, काही लोक दररोज रात्री जेवल्यानंतर एक किंवा दोन किलोमीटर चालतात. यातून पचन सुधारतं. पण, जास्त ऊर्जा खर्च करणे देखील हानिकारक आहे. तज्ज्ञ म्हणतात की, रात्री दोन किलोमीटर चालण्याऐवजी फक्त 100 पावलं चाललं पाहिजे. 100 पावलं चालल्यानंतर पोटात जठराग्नि प्रदीप्त होतो आणि पचन सुधारतं. यापेक्षा जास्त चालल्यास शरीरातील ऊर्जा वाया जाते.