Monkeypox Symptoms: मंकीपॉक्सचा विळखा कसा ओळखावा? ही लक्षणे दिसताच धोका समजून जा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घातक आजार म्हणून घोषित केलेल्या मंकीपॉक्सची भारतात अनेक प्रकरणे आढळत आहेत. अशा परिस्थितीत हा आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.
भारतात मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या आजाराला घातक आजार म्हणून घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली. यानंतर संबंधित व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत हा आजार काय आहे, त्याचा त्रास कोणाकोणाला होऊ शकतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.
मंकीपॉक्स हा आजार काय आहे?
मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने हा आजार फैलावतो. एमपॉक्स या नावाने देखील हा आजार ओळखला जातो. या व्हायरसचा धोका मुख्यतः मनुष्य आणि जनावरांना आहे. मंकीपॉक्स हा आजार साधारणतः 2 ते 4 आठवडे राहतो तर याची लक्षणे 3 ते 17 दिवसांनी दिसू लागतात. आज आपण मंकीपॉक्सची लक्षणे आणि त्याच्या बचाव पद्धती जाणून घेऊया.
advertisement
मंकीपॉक्सची लक्षणे
सुरूवातीची लक्षणे
> ताप येणे
> डोके दुखणे
> अंगदुखी जाणवणे
> थंडी वाजणे
> थकवा जाणवणे
ताप सुरू झाल्यानंतर 1-3 दिवसांनंतरची लक्षणे
> हात आणि तळव्यांवर ठिपके, पू भरलेले फोड, उठलेले अडथळे
> कंबरदुखी
> खोकला येणे
advertisement
मंकीपॉक्सवरील उपचार
या आजारावर काही विशेष उपचार उपलब्ध नाहीत. मात्र आपण काही घरगुती उपाय करून पाहू शकतो.
> ताप आणि अंरदुखी असल्यास पॅरासिटामोल (ॲसिटामिनोफेन) किंवा ibuprofen सारखी औषधे घेऊ शकतो.
> हाइड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी आणि लिक्विड डाएट घ्यावा.
advertisement
> संसर्ग रोखण्यासाठी त्वचेवरील जखमा सतत स्वच्छ करत राहणे आवश्यक आहे.
> तज्ज्ञांच्या सल्ल्याने अँटीव्हायरल औषधांचे सेवन करावे.
> व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2024 1:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Monkeypox Symptoms: मंकीपॉक्सचा विळखा कसा ओळखावा? ही लक्षणे दिसताच धोका समजून जा