TRENDING:

एका दिवसात किती बिअर पिऊ शकतो? डॉक्टरांनीच सांगितलं योग्य प्रमाण

Last Updated:

अनेक लोक रोज बिअरचे बरेच कॅन पितात. एका दिवसांत किती बिअर पिणं सुरक्षित असतं, याबाबत लिव्हर तज्ज्ञांकडून सत्य जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दारू पिण्यापेक्षा बिअर पिणं चांगलं असतं, तसंच यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही, असं काही लोकांना वाटतं. सामान्यपणे बिअरमध्ये चार ते पाच टक्के अल्कोहोल असते. पण काही ब्रँड्सच्या बिअरमध्ये दारूप्रमाणे अल्कोहोल असतं. रोज मोठ्या प्रमाणात लोक बिअरचे एक ते दोन कॅन पितात. यामुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असं त्यांना वाटतं. अनेक लोक रोज बिअरचे बरेच कॅन पितात. एका दिवसांत किती बिअर पिणं सुरक्षित असतं, याबाबत लिव्हर तज्ज्ञांकडून सत्य जाणून घेऊया.
अनेक लोक रोज बिअरचे बरेच कॅन पितात. एका दिवसांत किती बिअर पिणं सुरक्षित असतं, याबाबत लिव्हर तज्ज्ञांकडून सत्य जाणून घेऊया.
अनेक लोक रोज बिअरचे बरेच कॅन पितात. एका दिवसांत किती बिअर पिणं सुरक्षित असतं, याबाबत लिव्हर तज्ज्ञांकडून सत्य जाणून घेऊया.
advertisement

नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट अँड पँन्क्रियाटिको बिलियरी सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा यांनी न्यूज 18 ला सांगितलं की, `जेव्हा अल्कोहोल लिव्हरमध्ये पोहोचते, तेव्हा लिव्हर ते फिल्टर करते. यावेळी लिव्हरमधील काही पेशींचे नुकसान होते. लिव्हरमध्ये नवीन पेशी निर्मितीची क्षमता असते. त्यामुळे काही वेळातच नवीन पेशी तयार होतात. पण सातत्याने जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास लिव्हरची नवीन पेशी निर्मिती करण्याची क्षमता कमी होते आणि लिव्हर खराब होते. अल्कोहोलमुळे लिव्हरचे अनेक विकार होतात.

advertisement

वयात उरकून घ्या, कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद, आश्चर्यकारक माहिती समोर

डॉ. अरोरा यांनी सांगितले की, `बिअरमध्ये दारूच्या तुलनेत अल्कोहोल कमी असते. पण आपल्या शरीरासाठी अल्कोहोलचे कितीही प्रमाण सुरक्षित नसते. लिव्हरच्या आरोग्यासाठी बिअर पिणं योग्य नाही. ज्या व्यक्तींना लिव्हरशी संबंधित समस्या आहे, त्यांनी बिअर पिऊ नये. यामुळे लिव्हर खराब होऊ लागते. जास्त प्रमाणात बिअर प्यायल्याने डायबेटीसच्या रुग्णांमध्ये ब्लड शुगरच्या पातळीत चढ-उतार होऊ शकते. तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यासाठी बिअर चांगली नाही. त्यामुळे लोकांनी बिअरपासून दूर राहावे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, शरीरासाठी अल्कोहोलचा एक थेंब देखील सुरक्षित नाही. अल्कोहोलच्या पहिल्या थेंबापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. दारू आणि बिअरमध्ये अल्कोहोल मिसळले जाते. हा एक विषारी पदार्थ असून त्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने अल्कोहोलचा समावेश ग्रुप 1 कार्सिनोजेनमध्ये केला होता. कार्सिनोजेन हा कॅन्सर निर्माण करणारा घटक आहे. डब्ल्यूएचओनुसार, लोकांनी अल्कोहोल टाळला पाहिजे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एका दिवसात किती बिअर पिऊ शकतो? डॉक्टरांनीच सांगितलं योग्य प्रमाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल