वयात उरकून घ्या, कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद, आश्चर्यकारक माहिती समोर

Last Updated:

समोर आलेल्या रिपोर्टमध्ये लग्नसंस्थेबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यात असाही दावा करण्यात आला आहे की येत्या काही वर्षांमध्ये लग्नाची संकल्पना पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

समोर आलेल्या रिपोर्टमध्ये लग्नसंस्थेबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यात असाही दावा करण्यात आला आहे की येत्या काही वर्षांमध्ये लग्नाची संकल्पना पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.
समोर आलेल्या रिपोर्टमध्ये लग्नसंस्थेबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यात असाही दावा करण्यात आला आहे की येत्या काही वर्षांमध्ये लग्नाची संकल्पना पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये लग्नसंस्थेला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. मात्र बदलत्या सामाजिक आणि वैयक्तिक स्थितीमुळे यातही बदल दिसून येऊ लागले आहेत. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी लग्नाची संकल्पनाच बदलत चालली आहे. अशातच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये लग्नसंस्थेबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यात असाही दावा करण्यात आला आहे की येत्या काही वर्षांमध्ये लग्नाची संकल्पना पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.
भारतीय समाजात लग्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला पती-पत्नीचे अतूट बंध म्हटले गेले आहे. तथापि, सध्याच्या घडीला ही लग्नसंस्था ढासळताना दिसत आहे. रोज आपण जोडप्यांच्या घटस्फोटाच्या आणि आपापसातील मतभेदांच्या बातम्या ऐकत आणि वाचत असतो. त्यातच सोशल मीडियावर डेटिंग, लिव्ह-इन रिलेशनशिप या प्रकारांचे समर्थन करताना लोक दिसत आहेत. ही परदेशी संकल्पना आता भारतातही स्थिरावताना दिसत आहे.
advertisement
या रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार महिलांना आता स्वतंत्र राहायचे आहे. त्यांना लग्न हे एक बंधन वाटते आणि म्हणूनच त्या लग्न न करण्यात आनंद मानताना दिसत आहेत. परिणामी येत्या काळामध्ये लग्न ही संकल्पना कायमची नष्ट होऊ शकते. एक्सपर्ट्सच्या विश्लेषणानुसार सामाजिक बदल, वाढता युक्तिवाद आणि विकसित होत असलेल्या लैंगिक भूमिकांमुळे पारंपारिक विवाहपद्धती संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिप आणि अपारंपरिक संबंध वाढत आहेत. यामुळे लग्नाची गरज संपत चालली आहे.
advertisement
प्रपोज करण्यात नेहमी मुलांचाच पुढाकार का? मनातील भावना व्यक्त करण्यापासून मुलींना रोखतात या गोष्टी
याशिवाय तंत्रज्ञानातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे देखील एक कारण आहे. यामुळे भविष्यात मानवी संबंध वेगळे दिसू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. महिलांना आता आत्मनिर्भर जीवन जगायचे आहे. त्यांना लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही. महिलांना असे वाटते की विवाह हे बंधन आहे, जिथे त्यांना स्वातंत्र्य नाही, भविष्य नाही, करिअरमध्ये प्रगती करू शकत नाही. या सगळ्याचा परिणाम असा होईल की येत्या सहा-सात दशकांत म्हणजे साधारण 2100 पर्यंत लग्न ही संकल्पना संपुष्टात येईल.
advertisement
'लॅन्सेट'च्या अभ्यासानुसार, सध्या पृथ्वीवर ८ अब्ज लोक राहतात. येत्या काही दिवसांत या संख्येत लक्षणीय बदल होणार आहेत. जागतिक पातळीवर लोकसंख्येचा प्रजनन दर झपाट्याने कमी होत आहे. या बदलाचा भविष्यात मानवावर अधिक परिणाम होईल, असे मानले जात आहे. १९५० पासून सर्वच देशांमध्ये जन्मदर कमी होत आहे. १९५० मध्ये लोकसंख्येचा प्रजनन दर ४.८४% होता. तर २०२१ पर्यंत ते २.२३% पर्यंत कमी झाले आहे. २०१० पर्यंत ते १.५९% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
वयात उरकून घ्या, कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद, आश्चर्यकारक माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement