नॉन-स्टिक भांड्यांवर सामान्यतः पॉलीटेट्राफ्लुओरोएथिलीन (PTFE) नावाच्या पदार्थाची कोटिंग केली जाते, ज्याला टेफ्लॉन कोटिंग म्हणतात. काही भांड्यांवर सिरेमिक कोटिंग देखील वापरले जाते, जे अन्नाला चिटकण्यापासून वाचवते.
अनेकदा लोक नॉन-स्टिक भांड्यांमध्ये स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या चमच्यांचा वापर करतात. त्यामुळे कोटिंग हळूहळू निघतं आणि भांडं खराब होऊ लागतं. तरीसुद्धा अनेक लोक त्याच भांड्यात स्वयंपाक करत राहतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
advertisement
तज्ज्ञ काय सांगतात?
SGT युनिव्हर्सिटी, गुरुग्राम येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. भुपेश कुमार शर्मा सांगतात की, जेव्हा नॉन-स्टिक भांड्यावरील टेफ्लॉन कोटिंग निघते, तेव्हा त्यातून मायक्रोस्कोपिक कण सुटतात आणि अन्नामध्ये मिसळतात. हे कण शरीरात गेले तर ताप, अंगदुखी यांसारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. याला पॉलिमर फ्यूम फिव्हर असेही म्हटले जाते.
विशेषत: जर पॅन खूप तापवला गेला, तर त्यातून हानीकारक रसायने (PFAS) बाहेर पडतात. ही रसायने अन्नात मिसळून हॉर्मोन्सचे संतुलन बिघडवतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात आणि शरीरात टॉक्सिकिटी वाढवतात.
नॉन-स्टिक भांडं सुरक्षित कशी ठेवावी?
नेहमी लाकडी किंवा सिलिकॉनच्या चमचा वापरा.
रिकामे पॅन जास्त आगीवर ठेवू नका.
गरम भांड लगेच पाण्यात बुडवू नका किंवा त्यात पाणी टाकू नका.
धुताना लोखंडी काता वापरण्याऐवजी मऊ स्पंज वापरा.
जर कोटिंग बऱ्याच प्रमाणात निघाले असेल तर नवीन पॅन वापरणेच उत्तम.
नॉन-स्टिक भांडी सोयीची असली तरी योग्य वापर आणि काळजी न घेतल्यास ती आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)