2050 सालापर्यंत जगातील पन्नास टक्के लोकसंख्या लठ्ठ असेल. ही स्थिती केवळ हृदयासाठीच नाही तर इतर आजारांनाही मोठं आमंत्रण ठरु शकेल. म्हणून, आतापासूनच खाण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करणं खूप महत्वाचं आहे. पद्मभूषण डॉ.टी.एस.क्लेअर यांच्या मते, लठ्ठपणा आता झपाट्यानं वाढतो आहे. डॉ क्लेअर यांनी ओबेसिटी असोसिएशन ऑफ द वर्ल्डचा संदर्भ यासाठी दिला आहे.
advertisement
Wrinkles - चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरा हे तेल, चेहरा पुन्हा होईल तजेलदार
लठ्ठपणा कसा टाळायचा ? लठ्ठपणा कसा रोखायचा ?
डॉ. क्लेअर यांच्या मते, जर तुम्ही लठ्ठपणानं त्रस्त असाल किंवा लठ्ठपणा टाळायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आहारातल्या कॅलरीजची विशेष काळजी घ्यावी लागेल. अन्नामुळे लठ्ठपणा वाढू शकतो याचं भान असणं गरजेचं आहे. यासाठी काहीही खाताना कॅलरीज मोजणं सर्वात महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही दोन वाट्या लापशी आणि दोन वाट्या गुलाब जाम खाल्ले तर दलियापेक्षा गुलाबजाम खाल्ल्यानं जास्त कॅलरीज वाढतील. त्याचप्रमाणे सॅलड खाल्ले तर कॅलरीज कमी वाढतात. असं गणित डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे.
Kitchen Jugaad : फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी कणिक पुन्हा पुन्हा वापरताय? तोटे ऐकलात तर आताच फेकून द्याल
हंगामी फळं आणि भाज्या खाण्यावर भर द्या.
आहारामध्ये, त्या त्या हंगामातील फळं आणि भाज्या निवडण्यावर भर द्या असंं डॉक्टर क्लेअर सांगतात. आजकाल बहुतेक फळं आणि भाज्या प्रत्येक हंगामात मिळतात. पण ऋतूनुसार उपलब्ध फळं आणि भाज्या खा असं डॉ.क्लेअर यांनी सुचवलं आहे. तसंच स्टोअरमध्ये दीर्घकाळ ठेवलेली फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करु नका. तसंच प्रत्येक रंगाच्या भाज्यांना आपल्या ताटात स्थान दिलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असा आहार घ्या.
हृदयाचं आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. प्रत्येकानं नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आहारात प्रथिनांचं प्रमाण पुरेसं असणं आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीचं वजन साठ किलो असेल तर त्याने दररोज 60 ग्रॅम प्रथिनं खावीत असं उदाहरण त्यांनी दिलं. वजन जितकं नियंत्रणात राहील आणि जेवढा नैसर्गिक आणि सकस आहार असेल, तेवढं हृदय निरोगी राहील. यासाठी घरी बनवलेलं अन्न जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला डॉ. क्लेअर देतात.
या टिप्स नक्की लक्षात ठेवा, जेणेकरुन तुम्ही लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांपासून स्वत:चं रक्षण करु शकाल, आणि त्यासाठीचे बदल आतापासून करु शकाल.