TRENDING:

Men's Fashion : बॉडी शेपनुसार मुलांसाठी 'हे' ब्लेझर असतात परफेक्ट! देतात Classy आणि Attractive लुक..

Last Updated:

Perfect blazers for boys according to body shape : मुलांना ऑफिस युजसाठी किंवा कधी कॅज्युअल युजसाठी ब्लेझर वापरायला आवडतात. पण बऱ्याचदा कोणता ब्लेझर घ्यावा. आपल्या अंगावर काय चांगलं दिसेल हे कळत नाही. तुमच्या या समस्येचं निराकरण इथे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलांच्या फॅशनमध्ये खूप कमी गोष्टी बोलण्यासारख्या असतात, पण त्याही व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आज आपण मुलांच्या ब्लेझरच्या निवडीविषयी बोलत आहोत. मुलांना ऑफिस युजसाठी किंवा कधी कॅज्युअल युजसाठी ब्लेझर वापरायला आवडतात. पण बऱ्याचदा कोणता ब्लेझर घ्यावा. आपल्या अंगावर काय चांगलं दिसेल हे कळत नाही.
ब्लेझर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा..
ब्लेझर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा..
advertisement

तुमच्या या समस्येचं निराकरण इथे आहे. आज आम्ही तुम्हाला मुलांनी त्यांच्या बॉडी शेपनुसार किंवा बॉडी टाइपनुसार कोणता ब्लेझर निवडावा याबद्दल महिती देत आहोत. तसेच कोणत्या प्रसंगी कोना ब्लेझर चांगले दिसेल हेही सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

बॉडीशेपनुसार असं निवडा ब्लेझर..

- उंच मुलांना लहान V-आकाराचे ब्लेझर चांगले दिसतात. हवे असल्यास तुम्ही जास्त बटण असलेला ब्लेझर घ्या. यामुळे छातीवर लहान V-आकार तयार होतो. या आकारामुळे तुम्ही आणखी क्लासी दिसता.

advertisement

- याउलट उंची कमी नसलेल्या मुलांना कमी बटण असलेला ब्लेझर चांगला दिसतो. या ब्लेझरमध्येही छातीवर मोठा V-आकार तयार होतो, जो उंची जास्त भासवतो आणि आपला लूक पूर्णपणे बदलू शकतो. कमी उंचीचा फायदा असा होतो की, यामुळे प्रत्येक प्रकारचे ब्लेझर मुलांवर चांगले दिसू शकते. फक्त टाईट ब्लेझर टाळा.

- टाईट ब्लेझर वजन जास्त असलेल्या व्यक्तीनेही घालणं टाळावं. अशा मुलांनी शक्यतो हलके, सैल आणि कम्फर्टेबल ब्लेझर निवडावे. या ब्लेझरमुळे बॉडी व्यवस्थित शेपमध्ये दिसते आणि छान लूक येतो.

advertisement

- ज्या मुलांचा बांधा म्हणजेच खांदे रुंद आहेत त्या मुलांना स्लिम-फिट ब्लेझर चांगले दिसतात. हे ब्लेझर शरीराचा आकार अजून सुंदरपणे दाखवतात. त्यामुळे आकर्षक लूक तुम्हाला मिळू शकतो. कमी हाईटवाली मुलं रुंद लेपल्स किंवा दुहेरी बटणांच्या रेषा असलेले ब्लेझर घालू शकतात. यामुळे शरीर उंच दिसू शकते.

ब्लेझर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा..

advertisement

ब्लेझर घेताना तुम्ही आणखी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ब्लेझरचे खांदे तुमच्या खांद्यांची मॅच झाले पाहिजेत. म्हणजेच ब्लेझर व्यवस्थित मापात हवं. खांदे खाली उतरू नये. ब्लेझरच्या बाह्या देखील तुमच्या मनगटांपर्यंत यायला हव्या. उंचीही व्यवस्थित असावी. ब्लेझरच फिटिंग व्यवस्थित नसेल तर तुमचा तुमचा लूक खराब होऊ शकतो.

फंक्शन आणि वातावरणानुसारही तुमच्या ब्लेझरची चॉईस बदलू शकते. लग्न किंवा कार्यक्रमासाठी तुम्ही शिवलेला ब्लेझर निवडू शकता. डेली लूकसाठी हलका ब्लेझर, उन्हाळ्यात पातळ ब्लेझर तर हिवाळ्यात तुम्ही उब देणारा जाड कापड असलेला ब्लेझर निवडू शकता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं मंदिर, जिथं 90 वर्षांपासून सुरू आहे अखंड दिवा, इतिहास तुम्हाला माहितीये का?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Men's Fashion : बॉडी शेपनुसार मुलांसाठी 'हे' ब्लेझर असतात परफेक्ट! देतात Classy आणि Attractive लुक..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल